• Download App
    बंगालच्या उपसागरात आणखी एक चक्रीवादळ, हवामान विभागाचा इशारा|Another hurricane in the Bay of Bengal, the Meteorological Department warned

    बंगालच्या उपसागरात आणखी एक चक्रीवादळ, हवामान विभागाचा इशारा

    गोवा, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये हाहाकार माजविलेले तोक्ते चक्रीवादळ क्षमत नाही तोपर्यंत बंगालच्या उपसागरात आणखी एक नवीन चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्यामुळे २३ मेच्या दरम्यान आणखी एक चक्रवादळ तयार होण्याची भीती आहे.Another hurricane in the Bay of Bengal, the Meteorological Department warned


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : गोवा, महाराष्टÑ आणि गुजरातमध्ये हाहाकार माजविलेले तोक्ते चक्रीवादळ क्षमत नाही तोपर्यंत बंगालच्या उपसागरात आणखी एक नवीन चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे.

    बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्यामुळे २३ मेच्या दरम्यान आणखी एक चक्रवादळ तयार होण्याची भीती आहे.भारतीय हवामान विभागाने या चक्रीवादळाचे नाव यास असे ठेवले आहे.



    हवामान विभागाच्या महासंचालक सुनिथा देवी म्हणाल्या, बंगालच्या उपसागरात पुढील आठवड्यात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र आणखी विस्तारण्याची शक्यता आहे.

    त्यामुळे चक्रीवादळ तयार होऊ शकते. अरबी समुद्राचे आणि बंगालच्या उपसागरचे तापमान सरासरीपेक्षा एक ते दोन डिग्री सेल्सियसने वाढले आहे.

    ही परिस्थिती चक्रीवादळ तयार होण्यासाठी अनुकुल आहे. बंगालच्या उपसागराचे तापमान ३१ अंश सेल्सियस आहे. त्याचबरोबर समुद्रातील इतरही परिस्थिती चक्रीवादळासाठी अनुकुल आहे.

    Another hurricane in the Bay of Bengal , the Meteorological Department warned

    Related posts

    Rajnath : राजनाथ म्हणाले- ऑपरेशन सिंदूर स्वेच्छेने थांबवले; भारत आयटीचे केंद्र तर पाकिस्तान आंतरराष्ट्रीय दहशतवादाचे केंद्र

    निकालाची “अशी” चाहूल : स्टालिन शांतपणे कामगार दिनाच्या कार्यक्रमात; पण ममता घुसल्या EVM च्या स्ट्रॉंगरूम मध्ये!!

    सुप्रीम कोर्टाने म्हटले- रेप पीडितेच्या गर्भपातावरील कालमर्यादा हटवा, केंद्राला सांगितले-कायद्यात बदल करा