राज्यातील हिंसाचारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा घेतला आढावा
विशेष प्रतिनिधी
इंफाळ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सोमवारी (२९ मे) हिंसाचारग्रस्त मणिपूरला पोहोचले. राज्यात पोहोचताच त्यांनी मुख्यमंत्री एन.के. बिरेन सिंह आणि मंत्री, वरिष्ठ नेते व अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेतली. केंद्रीय गृहमंत्री चार दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते राज्यातील हिंसाचारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. Amit Shah arrives in violencehit Manipur high level meeting with Chief Minister N Biren Singh and officials
गृहमंत्री अमित शाह दिल्लीहून विशेष विमानाने इंफाळच्या बीर टिकेंद्रजीत इंफाळ आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. पीटीआयच्या सूत्रांनी सांगितले की, अमित शाह मंगळवारी (३० मे) परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि सामान्य स्थिती पूर्ववत करण्यासाठी अनेक बैठका घेऊ शकतात. यासोबतच ते बुधवारी (३१ मे) पत्रकार परिषदेला संबोधित करून राज्यात सुरू असलेल्या हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी उचललेल्या पावलांची घोषणा करू शकतात.
जातीय हिंसाचारात आतापर्यंत ७५ हून अधिक जणांचा मृत्यू –
सुरक्षा सूत्रांनी सांगितले की ते गुरुवारी (१जून) सकाळी इंफाळहून परत येऊ शकतात. मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार सुरू झाल्यानंतर अमित शाह यांचा हा पहिलाच राज्य दौरा आहे. मणिपूरमध्ये जातीय संघर्षात ७५ हून अधिक लोक मारले गेले, त्यानंतर ३ मे रोजी पहाडी जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जमाती (एसटी) दर्जा मिळावा या मागणीला विरोध करण्यासाठी आदिवासी एकता मोर्चा काढण्यात आला.
Amit Shah arrives in violencehit Manipur high level meeting with Chief Minister N Biren Singh and officials
महत्वाच्या बातम्या
- केंद्राच्या शौर्य पुरस्कारांच्या धर्तीवर महाराष्ट्र शासन सावरकरांच्या नावे शौर्य पुरस्कार देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
- एर्दोगान पुन्हा एकदा तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष, सलग अकराव्यांदा राज्याभिषेक होणार
- पुणे लोकसभेची जागा काँग्रेसकडून खेचून घ्यायचा राष्ट्रवादीचा चंग; अजितदादांचा आग्रह!!
- नव्या संसदेत सेंगोल, चाणक्य आणि अखंड भारताचा नकाशा; “कबुतरी शांती”ला फाटा देत गरुड झेपेची आशा!!