• Download App
    हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये अमित शाह दाखल; मुख्यमंत्री एन बिरेन सिंह आणि अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक! Amit Shah arrives in violencehit Manipur high  level meeting with Chief Minister N Biren Singh and officials

    हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये अमित शाह दाखल; मुख्यमंत्री एन बिरेन सिंह आणि अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक!

    राज्यातील हिंसाचारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा घेतला आढावा

    विशेष प्रतिनिधी

    इंफाळ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सोमवारी (२९ मे) हिंसाचारग्रस्त मणिपूरला पोहोचले. राज्यात पोहोचताच त्यांनी मुख्यमंत्री एन.के. बिरेन सिंह आणि मंत्री, वरिष्ठ नेते व अधिकाऱ्यांची  उच्चस्तरीय  बैठक घेतली. केंद्रीय गृहमंत्री चार दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते राज्यातील हिंसाचारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. Amit Shah arrives in violencehit Manipur high  level meeting with Chief Minister N Biren Singh and officials

    गृहमंत्री अमित शाह दिल्लीहून विशेष विमानाने इंफाळच्या बीर टिकेंद्रजीत इंफाळ आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. पीटीआयच्या सूत्रांनी सांगितले की, अमित शाह मंगळवारी (३० मे) परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि सामान्य स्थिती पूर्ववत करण्यासाठी अनेक बैठका घेऊ शकतात. यासोबतच ते बुधवारी (३१ मे) पत्रकार परिषदेला संबोधित करून राज्यात सुरू असलेल्या हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी उचललेल्या पावलांची घोषणा करू शकतात.

    जातीय हिंसाचारात आतापर्यंत ७५ हून अधिक जणांचा मृत्यू –

    सुरक्षा सूत्रांनी सांगितले की ते गुरुवारी (१जून) सकाळी इंफाळहून परत येऊ शकतात. मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार सुरू झाल्यानंतर अमित शाह यांचा हा पहिलाच राज्य दौरा आहे. मणिपूरमध्ये जातीय संघर्षात ७५ हून अधिक लोक मारले गेले, त्यानंतर ३ मे रोजी पहाडी जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जमाती (एसटी) दर्जा मिळावा या मागणीला विरोध करण्यासाठी आदिवासी एकता मोर्चा काढण्यात आला.

    Amit Shah arrives in violencehit Manipur high  level meeting with Chief Minister N Biren Singh and officials

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Longest serving PM : नरेंद्र मोदी, सेवारत जन स्वधर्म तत्पर!!

    Mamata Banerjee : टीएमसीत बंडानंतर ममता बॅनर्जींची मोठी चाल; कल्याण बॅनर्जी लोकसभेचे मुख्य व्हिप, पण पेच कायम

    PM Narendra Modi : मोदी सलग सर्वाधिक काळ निवडलेले पंतप्रधान; नेहरूंचा 4398 दिवसांचा विक्रम मोडला; आज एनडीएतील घटक पक्षांना संबोधित करणार