विशेष प्रतिनिधी
अमृतसर : पंजबामधील काँग्रेसचे सर्व आमदार वाळूच्या अवैध व्यापारात गुंतले आहेत. मात्र, आपण कोणाचीही नावे सार्वजनिक करणार नाहीत, कोण सहभागी आहे याऐवजी कोण सहभागी नाही हे विचारा. मी नावं सांगायला सुरुवात केली तर वरून सुरुवात करावी लागेल.All the Congress MLAs are sand mafia, former Punjab Chief Minister K. Amarinder Singh’s allegation
मला ते करायचे नाही, असा आरोप पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केल.पारोल गावातील मोहिंदर बाग येथील त्यांच्या फार्महाऊसवर निवडक माध्यमांशी कॅ. अमरिंदरसिंग यांनी संवाद साधला.
अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सांगितले होते की त्यांच्या पक्षाचे अनेक आमदार अवैध वाळूच्या व्यापारात गुंतल्याचे अहवाल त्यांच्याकडे आहेत. पंजाब विधानसभेच्या अधिवेशनातही त्यांनी याच गोष्टीचा पुनरुच्चार केला होता.
कॅ. अमरिंदर सिंग यांनी बुधवारी पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावरही हल्ला चढवला. ते म्हणाले की पवित्र ग्रंथांची विटंबना करणाºयांना रस्त्याच्या मधोमध फाशी द्यावी,
असे म्हणणे त्यांच्यासाठी अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे. नुकत्याच घडलेल्या अपवित्र घटनांमध्ये धार्मिक धर्तीवर लोकांचे ध्रुवीकरण करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे राज्यात अशांतता आणि संकट निर्माण होऊ शकते.
All the Congress MLAs are sand mafia, former Punjab Chief Minister K. Amarinder Singh’s allegation
महत्त्वाच्या बातम्या
- इथे भ्रष्टता, तिथे नष्टता, शंखच पोकळ फुंकू नका, देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडीवर काव्यात्मक हल्लाबोल
- उत्तर प्रदेशांत सभांवर बंदी घाला, विधानसभा निवडणुकाही पुढे ढकला, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे पंतप्रधानांना आवाहन
- ऑलवेज देअर फॉर यू, उदयनराजे भोसले व्यासपीठावरच रडू लागले
- पाश्चात्य संगीतापेक्षा विमानांमध्ये भारतीय संगीताला प्राधान्य द्यावे, नामांकित गायक व संगीतकारांची ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे मागणी