• Download App
    एअर इंडिया वाढविणार मुंबई, पुणे, औरंगाबादच्या विमानफेऱ्या , प्रवासी संख्या वाढविण्यासाठी निर्णय|Air India to increase flights to Mumbai, Pune, Aurangabad, decision to increase the number of passengers

    एअर इंडिया वाढविणार मुंबई, पुणे, औरंगाबादच्या विमानफेऱ्या , प्रवासी संख्या वाढविण्यासाठी निर्णय

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरल्यानंतर विमानप्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे देशांतर्गत विमानाच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय एअर इंडियाने घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तील मुंबई, पुणे आणि औरंगाबादच्या विमानफेऱ्यांचा समावेश आहे.Air India to increase flights to Mumbai, Pune, Aurangabad, decision to increase the number of passengers

    मुंबई, औरंगाबाद आणि पुणे विमानतळावरून दिल्ली, अमृतसर आणि जामनगरसाठी विशेष फेºयांचे नियोजन करण्यात येणार आहे. मुंबई ते जामनगर आणि मुंबई ते अमृतसर थेट सेवा आठवड्यातून पाच दिवस चालविण्यात येईल. त्याशिवाय औरंगाबाद-दिल्ली, मुंबई-औरंगाबाद आणि पुणे-दिल्ली मार्गावर अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत.



    महाराष्ट्रातून देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे एअर इंडियाने महाराष्ट्राला प्राधान्य दिले आहे. काही ठिकाणच्या विमानाच्या सेवेला प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे या फेऱ्या कमी करून ज्या मार्गावर प्रवासी अधिक आहेत तेथे वळविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सर्वाधिक मागणी मुंबई- दिल्ली या विमानसेवेला आहे.

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर देशांतर्गत विमान सेवेतील फेऱ्या कमी करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय विमानप्रवसावरही निर्बंध आणण्यात आले होते.

    केंद्र सरकारने विमान कंपन्यांना आणि विमानतळ हाताळणाऱ्या कंपन्यांना सोशल डिस्टंसिंगचे कडेकोट पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार बोर्डिंगपास काढताना तसेच प्रतिक्षालयातील आसन व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.

    तसेच विमानात देखील दोन आसनामध्ये एक आस रिक्त ठेवण्यात आले आहे. प्रवाशांना करोनापासून संरक्षित करण्यासाठी तोंडावर मास्क, आवरण, हातमौजे अशा प्रकारच्या उपायोजना विमान कंपन्यांनी आणि विमानतळ प्राधिकरणाने केल्या आहेत.

    Air India to increase flights to Mumbai, Pune, Aurangabad, decision to increase the number of passengers

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pakistani Army Chief : पाकिस्तानी लष्करप्रमुख म्हणाले- देशाला दिलेले वचन पूर्ण केले; भारतीय सैनिक आम्हाला घाबरवू शकत नाहीत

    PM Modi : पीएम मोदी म्हणाले- पाकिस्तानकडून हल्ला झाल्यास चोख प्रत्युत्तर देऊ; कारवाई फक्त स्थगित, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही

    Amit Shah : पंतप्रधान मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताच्या शत्रूंसाठी मर्यादा निश्चित केली – अमित शाह