• Download App
    पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांना ओवेसींचे प्रत्युत्तर, म्हणाले - इस्लामचा क्रिकेटशी काय संबंध, मंत्री वेडा आहे! । AIMIM Owaisi reply to Pakistan Home Minister said, What has Islam got to do with cricket, Minister is crazy

    पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांना ओवेसींचे प्रत्युत्तर, म्हणाले – इस्लामचा क्रिकेटशी काय संबंध, मंत्री वेडा आहे!

    उत्तर प्रदेशात आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने राज्यात सर्वच राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावली आहे. एमआयएमही येथे सक्रिय झाली आहे. एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. ओवैसी म्हणाले की, आपल्या शेजारी देशाचा एक मंत्री वेडा आहे. भारताकडून क्रिकेटमधील विजयाला त्यांनी इस्लामचा विजय म्हटले. अल्लाहचा आभारी आहे की, आमचे लोक तिकडे गेले नाहीत, नाहीतर हे वेडे बघावे लागले असते. इस्लामचा क्रिकेटशी काय संबंध?” AIMIM Owaisi reply to Pakistan Home Minister said, What has Islam got to do with cricket, Minister is crazy


    विशेष प्रतिनिधी

    मुझफ्फरनगर : उत्तर प्रदेशात आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने राज्यात सर्वच राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावली आहे. एमआयएमही येथे सक्रिय झाली आहे. एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. ओवैसी म्हणाले की, आपल्या शेजारी देशाचा एक मंत्री वेडा आहे. भारताकडून क्रिकेटमधील विजयाला त्यांनी इस्लामचा विजय म्हटले. अल्लाहचा आभारी आहे की, आमचे लोक तिकडे गेले नाहीत, नाहीतर हे वेडे बघावे लागले असते. इस्लामचा क्रिकेटशी काय संबंध?”

    ओवैसी पाक मंत्र्याला उद्देशून पुढे म्हणाले की, ‘लाज वाटत नाही तुम्हाला, तुम्ही तुमचा देश (पाकिस्तान) चीनकडे गहाण ठेवता आणि इस्लामबद्दल बोलता. त्या चीनला ज्याने वीस लाख मुस्लिमांना कैद केले आहे. ज्यांना जबरदस्तीने डुकराचे मांस खाऊ घातले जात आहे. तुम्ही मलेरियावर औषधही बनवू शकत नाही, मोटरसायकलचे टायर बनवू शकत नाही, भारत खूप पुढे आहे, त्यामुळे आमच्याशी पंगा घेऊ नका.’



    मुस्लिमांनी किती काळ सतरंज्या उचलायच्या, आता सत्ता मिळवायची वेळ

    मुस्लिमांना लोकशाही पद्धतीने न्याय देऊ, असे आश्वासन ओवैसी यांनी दिले. दंगल होऊ देणार नाही. ते म्हणाले की, मुस्लिमांना राजकीय शक्ती बनले पाहिजे. सपा, बसपा, काँग्रेस आणि आरएलडीसाठी किती काळ आम्ही सतरंज्या उचलत राहणार. आता सत्तेचा मुकुट डोक्यावर सजवण्याची वेळ आली आहे. आज तुमचा पक्ष AIMIM ला मत देण्याची वेळ आली आहे. मुस्लिमांची राजकीय ताकद वाढवणे हा आपल्या जीवनाचा उद्देश असल्याचे ओवैसी म्हणाले.

    AIMIM Owaisi reply to Pakistan Home Minister said, What has Islam got to do with cricket, Minister is crazy

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र