PM Modi threat call : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्याचे नाव सलमान आहे. काल रात्री त्याने पोलिसांना फोन करून पंतप्रधान मोदींना ठार मारण्याची धमकी दिली होती. आरोपीचे वय 22 वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. त्याला खजुरी खास ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे. 22 Year Old Delhi Youth detained after night-long search over PM Modi threat call
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्याचे नाव सलमान आहे. काल रात्री त्याने पोलिसांना फोन करून पंतप्रधान मोदींना ठार मारण्याची धमकी दिली होती. आरोपीचे वय 22 वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. त्याला खजुरी खास ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे.
सध्या सलमान पोलिस कोठडीत आहे आणि दिल्ली पोलिसांचे अधिकारी त्यांची चौकशी करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमानवर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत आणि तो सध्या जामिनावर तुरुंगातून बाहेर आहे. आरोपीच्या प्राथमिक चौकशीत त्याला पुन्हा तुरुंगात जाण्याची इच्छा असल्याने त्याने धमकीचा फोन केल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात दिल्ली पोलिसांनी आणखी एकाला अटक केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठार मारण्याची त्यानेही धमकी दिली होती. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्या व्यक्तीला ताबडतोब अटक केली आणि चौकशी केली असता तो माणूस नशेत असल्याचे आढळले आणि त्याने दारूच्या नशेत पोलिसांना फोन करून पंतप्रधानांना जिवे मारण्याची धमकी दिली होती.
22 Year Old Delhi Youth detained after night-long search over PM Modi threat call
महत्त्वाच्या बातम्या
- पंजाबात व्हॅक्सिन घोटाळा!, कोव्हॅक्सिन 400 रुपयांना घेऊन खासगी रुग्णालयांना 1096 रुपयांना विक्री केल्याचा आरोप
- केरळ सरकारचे 20 हजार कोटींचे कोविड पॅकेज, आरोग्य सेवा – लसीकरणावर लक्ष केंद्रित, कोणताही नवीन कर नाही
- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीडमध्ये उद्या मराठा क्रांती संघर्ष मोर्चाकडून एल्गार, विनायक मेटेंची माहिती
- निर्बंधांसह का असेना यावर्षी पायी वारी झालीच पाहिजे, भाजपची आध्यात्मिक आघाडी आक्रमक
- ठाकरे सरकारमध्ये एक मुख्यमंत्री अन् अनेक सुपर मुख्यमंत्री, अनलॉकच्या गोंधळावरून देवेंद्र फडणवीसांची टीका