• Download App
    सोनियांसह १२ नेत्यांचा मोदींच्या दिशेने “पत्रबाण”; ज्या केंद्रावर टीकास्त्र त्याच्याचकडे नऊ कलमी मागण्याही... पण पत्राचे खरे रहस्य काय?? 12 Opposition leaders write to PM Modi, blame govt for ‘apocalyptic human tragedy’

    सोनियांसह १२ नेत्यांचा मोदींच्या दिशेने “पत्रबाण”; ज्या केंद्रावर टीकास्त्र त्याच्याचकडे नऊ कलमी मागण्याही… पण पत्राचे खरे रहस्य काय??

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी सध्या बऱ्याच “पोलिटिकली ऍक्टीव्ह” झाल्या आहेत. बंगालच्या निवडणूकीत ममताउदय झाल्यापासून त्या अस्वस्थ असल्याचे बोलले जातेय. संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएचे नेतृत्व ममतांकडे जाण्याचा धोका त्यांना वाटतोय. त्यामुळे त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये बरीच राजकीय सक्रीयता दाखवायला सुरूवात केली आहे. 12 Opposition leaders write to PM Modi, blame govt for ‘apocalyptic human tragedy’



    याच राजकीय सक्रीयतेचा एक भाग म्हणून सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांच्या १२ नेत्यांना हातीशी धरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिशेने एक “पत्रबाण” सोडला आहे. अर्थात त्यांना पत्र लिहिले आहे. कोरोना फैलाव रोखण्यात तसेच राज्यांना त्यांच्या मागणीनुसार वैद्यकीय सुविधा पुरविण्यात केंद्र सरकारला घोर अपयश आल्याचे टीकास्त्र या पत्रातून सोडण्यात आले आहे. ज्या केंद्र सरकारवर हे टीकास्त्र सोडण्यात आलेय त्याच्याचकडे नऊ कलमी मागण्यांची यादीही देण्यात आली आहे. हे या पत्राचे वैशिष्ट्य आहे. हिंदुस्तान टाइम्सने ही बातमी दिली आहे.

    सोनिया गांधी यांच्यासह माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

    • कोरोना महामारीमुळे बेरोजगार झालेल्यांना दरमहा ६००० रुपये देणे,
    • जनतेला मोफत धान्यवाटपाची मुदत वाढविणे कारण देशाच्या गोदामात १ कोटी टन धान्य पडून आहे.
    • देशातील सर्वांसाठी मोफत लसीकरण ताबडतोब सुरू करणे. यासाठी देशांतर्गत लस उत्पादन वाढविणे. आंतरराष्ट्रीय पातळीवरून लस आयात करणे या उपाययोजना ताबडतोब कराव्यात. ३५००० कोटी लसीकरणावर खर्च करावेत. या प्रमुख मागण्या पत्रात करण्यात आल्या आहेत.
    • मोदींना १२ नेत्यांनी पाठविलेल्या या पत्रावर फारूक अब्दुल्ला, शरद पवार, तेजस्वी यादव यांच्याही स्वाक्षऱ्या असल्याचे हिंदुस्तान टाइम्सच्या बातमीत शेवटी म्हटले आहे.
    • पत्राचे राजकीय सहस्य काय…
    • काँग्रेस कार्यकारिणीने नुकताच वर मांडलेल्या मुद्द्यांवर आधारित ठराव मंजूर केलाच होता. त्यानंतर सोनिया गांधी यांनी पुढाकार घेऊन १२ नेत्यांच्या स्वाक्षऱ्या असेलेले पत्र पंतप्रधानांना पाठविले आहे. याचे रहस्य यूपीएमधील नेतृत्वाच्या संघर्षात आणि बंगालमधल्या ममताउदयात तर दडलेले नाही ना… अशी चर्चा दिल्लीतील राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

    12 Opposition leaders write to PM Modi, blame govt for ‘apocalyptic human tragedy’

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Anil Ambani : हवाला प्रकरणात अनिल अंबानी दुसऱ्यांदा गैरहजर; ऑनलाइन स्टेटमेंट देण्याची विनंती; 100 कोटींशी संबंधित हवाला प्रकरण

    Army Chief : लष्करप्रमुख म्हणाले- ऑपरेशन सिंदूर हा 88 तासांचा ट्रेलर होता; पाकने आणखी संधी दिल्यास उत्तर कठोर असेल

    PM Modi, : पीएम मोदी म्हणाले- लालू यादव यांनी विकासाऐवजी जंगलराज निवडले, बिहारच्या निकालांनी धडा शिकवला