• Download App
    Mamata Banerjee's quarrel with Modi government again, Pegasus case to be investigated। ममतादीदींचा मोदी सरकारशी पुन्हा पंगा, पेगॅसस प्रकरणाची चौकशी होणार सुरु

    ममतादीदींचा मोदी सरकारशी पुन्हा पंगा, पेगॅसस प्रकरणाची चौकशी होणार सुरु

    विशेष प्रतिनिधी

    कोलकता – पेगॅसस स्पायवेअरद्वारे पश्चिंम बंगालमधील राजकीय नेते, अधिकारी व इतरांवर पाळत ठेवल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या दोन सदस्यीय समितीचे काम पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे. ममतादीदींचा मोदी सरकारशी पुन्हा पंगा, पेगॅसस प्रकरणाची चौकशी होणार सुरु. Mamata Banerjee’s quarrel with Modi government again, Pegasus case to be investigated

    हा निर्णय़ घेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा पंतप्रधान मोदी यांच्या केंद्रातील सरकारशी पंगा घेतल्याचे मानले जाते. अशा प्रकारे चौकशी समिती नेमणारे प. बंगाल हे देशातील एकमेव राज्य आहेत.

    न्यायाधीश लोकूर व न्यायाधीश भट्टाचार्य यांच्या चौकशी समितीने राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये जाहीर सूचना दिली आहे. या समितीला सरकारने ‘न्यू टाउन’मध्येी कार्यालय, तसेच कर्मचारी उपलब्ध केले आहेत. यात सचिव व अन्य पदांवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सायबर गुन्ह्यांतील तांत्रिक तज्ज्ञ, वकील आणि पोलिस अधिकारी हे या समितीला मदत करणार आहेत. ऑनलाइन अर्जांसाठी संकेतस्थळही सुरू करण्यात येणार आहे.

    Mamata Banerjee’s quarrel with Modi government again, Pegasus case to be investigated

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Marco Rubio and S Jaishankar : अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी एस जयशंकर यांच्याशी केली चर्चा

    Asaduddin Owaisi : पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला असदुद्दीन ओवैसींनी सुनावले, म्हणाले..

    Operation Sindoor impact : भारत इथून पुढे दहशतवादाला act of war समजूनच ठोकणार, म्हणजे नेमके काय करणार??