• Download App
    Rahul Gandhi वाराणसीत राहुल गांधींच्या फोटोची परशुराम रुपात पूजा; एका हातात परशु, दुसऱ्या हातात घटना!!

    वाराणसीत राहुल गांधींच्या फोटोची परशुराम रुपात पूजा; एका हातात परशु, दुसऱ्या हातात घटना!!

    नाशिक : वाराणसीत राहुल गांधींच्या फोटोची परशुराम रुपात पूजा; एका हातात परशु, दुसऱ्या हातात घटना!!, असला प्रकार आज घडला.

    एकीकडे तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना यांच्यासारखे प्रादेशिक पक्ष उभे आडवे फुटत असताना त्यांच्या “राजकीय तब्येती”कडे लक्ष देण्याऐवजी काँग्रेसच्या नेत्यांनी आज राहुल गांधींचा वाढदिवस जोरदार साजरा केला. राहुल गांधींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काँग्रेसने त्यांच्या नेतृत्वाचे जोरदार ब्रॅण्डिंग केले.

    स्वतः राहुल गांधी वाढदिवस साजरा करायला राजधानी नवी दिल्लीतल्या 24 अकबर रोड या जुन्या काँग्रेसच्या मुख्यालयात पोहोचले तिथे त्यांनी काँग्रेसच्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांबरोबर केक कापून वाढदिवस साजरा केला. त्यावेळी 24 अकबर रोडच्या परिसरात जमलेल्या कार्यकर्त्यांना राहुल गांधींनी फ्लाईंग किस दिला.

    – राहुल गांधींची परशुराम रुपात पूजा

    कोणत्याच वेळी उत्तर प्रदेश मधल्या वाराणसी मध्ये राहुल गांधींच्या फोटोची परशुराम रुपात पूजा करण्यात आली. वाराणसी मधल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सनातन धर्मानुसार अभिषेक आणि पूजाअर्चा केली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वाराणसीच्या गंगा घाटावर राहुल गांधींचा फोटो परशुराम रुपात आणला. तिथे पुरोहितांनी केलेल्या मंत्र्याला राहुल गांधींच्या परशुराम रूपातल्या फोटोला दुधाचा अभिषेक घातला. राहुल गांधींच्या परशुराम रूपातल्या फोटोच्या एका हातात परशु आणि दुसऱ्या हातात राज्यघटनेचे लाल पुस्तक होते. या प्रकारातून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेश मधल्या ब्राह्मण वर्गाला चुचकारले. उत्तर प्रदेश मधल्या योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने किंवा समाजवादी पार्टीने ब्राह्मण समाजाला दूर लोटले असले, तरी काँग्रेसने मात्र ब्राह्मण समाजाला दूर लोटलेले नाही, असाच राजकीय संदेश यातून मुद्दामून दिला गेला.

    – भगवान परशुरामांचे प्रतीक

    राहुल गांधींच्या परशुराम रूपातल्या फोटोच्या अभिषेकाचा आणि पूजेचा फोटो आणि व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला. उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांचे राजकीय साटेलोटे होणार की नाही, याविषयी शंका आहे. पण दोन पक्षांचे सूत जुळून येवो किंवा न जुळून येवो निवडणुका तर लढवाव्याच लागतील हे लक्षात घेऊनच काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधींचा आजचा वाढदिवस साजरा केला. त्यासाठी त्यांनी भगवान परशुरामांचे प्रतीक निवडले.

    – ब्राह्मण समाजाला चुचकारले की काय!!

    राहुल गांधींनी आत्तापर्यंत कुठल्याही निवडणुकीच्या प्रचारात सनातन हिंदू धर्माच्या प्रतीकांचा फारसा वापर केला नव्हता. मात्र, त्यांनी आपण दत्तात्रय गोत्री ब्राह्मण असल्याचे सांगितले होते. निवडणुकीच्या काळात त्यांनी अनेक मंदिरांचा आणि मठांचा दौरा केला होता, पण त्याचबरोबर त्यांनी मशिदी आणि चर्चेसना सुद्धा भेटी दिल्या होत्या. पण आजच्या 57 व्या वाढदिवसाच्या दिवशी राहुल गांधी एकदम वेगळ्या भगवान परशुरामांच्या रूपात दिसले. त्यामुळे काँग्रेसने एकदम स्ट्रॅटेजी बदलून ब्राह्मण समाजाला चुचकारले की काय, असे राजकीय संशयाचे वातावरण निर्माण झाले.

    Youth Congress performs ‘dugdhabhishek’ on a poster of Rahul Gandhi.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    WhatsApp DP Scam : WhatsAppवर डीपी बदलून 7.8 कोटींची फसवणूक! माजी पंतप्रधानांच्या मुलालाही सायबर ठगांनी गंडवले; 4 कोटींची रक्कम गोठवली

    Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणूक- झारखंडमध्ये क्रॉस व्होटिंग, काँग्रेस उमेदवाराचा पराभव, भाजप-समर्थित विजयी, 12 राज्यांमधील 26 जागांपैकी 19 जागा एनडीएला

    Nripendra Mishra : ‘रामलल्लाच्या दानात हात घालणाऱ्यांना सात पिढ्यांचा शाप!’; नृपेंद्र मिश्रा संतप्त, ‘नोटांची बंडले खिशात घेऊन बाहेर पडल्याची चर्चा’