• Download App
    योगी आदित्यनाथांनी करून दाखविले, कोरोना पॉझिटिव्हिटी रेट १६.३३ टक्यांवरून ४.८ टक्के, मुंबई उच्च न्यायालयाने कौतुक करत महाराष्ट्रात यूपी मॉडेल राबविण्याच्या केल्या सूचना|Yogi Adityanath did it, Corona positivity rate from 16.33 per cent to 4.8 per cent, Mumbai High Court appreciates suggestions for implementation of UP model in Maharashtra

    योगी आदित्यनाथांनी करून दाखविले, कोरोना पॉझिटिव्हिटी रेट १६.३३ टक्यांवरून ४.८ टक्के, मुंबई उच्च न्यायालयाने कौतुक करत महाराष्ट्रात यूपी मॉडेल राबविण्याच्या केल्या सूचना

    संपूर्ण देशाला उत्तर प्रदेशातील कोरोना रुग्णांची धास्ती वाटत होती. मात्र, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी करून दाखविले असून राज्यातील कोरोना रेट पॉझिटिव्हिटी रेट १६.३३ टक्यांवरून ४.८ टक्यांवर आला आहे. उत्तर प्रदेशाच्या या कामगिरीचे निती आयोग, मुंबई उच्च न्यायालयासह जागतिक आरोग्य संघटनेनेही कौतुक केले आहे.Yogi Adityanath did it, Corona positivity rate from 16.33 per cent to 4.8 per cent, Mumbai High Court appreciates suggestions for implementation of UP model in Maharashtra


    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : संपूर्ण देशाला उत्तर प्रदेशातील कोरोना रुग्णांची धास्ती वाटत होती. मात्र, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी करून दाखविले असून राज्यातील कोरोना रेट पॉझिटिव्हिटी रेट १६.३३ टक्यांवरून ४.८ टक्यांवर आला आहे.

    उत्तर प्रदेशाच्या या कामगिरीचे निती आयोग, मुंबई उच्च न्यायालयासह जागतिक आरोग्य संघटनेनेही कौतुक केले आहे.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोनाविरुध्दच्या लढाईत संपूर्ण शासकीय यंत्रणा कामाला लावली.



    घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. त्यासाठी दहा लाखांहून अधिक पथके करण्यात आली आहेत. त्याचबरोबर राज्यात आयसीयू (अतिदक्षता विभाग) बेडची संख्याही वाढविण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने उत्तर प्रदेशाचे मॉडेल महाराष्ट्रातही राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

    देशातील महाराष्ट्रा सह अनेक राज्ये ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे हैैराण झाले आहेत. मात्र, उत्तर प्रदेशात सरकारने ऑक्सिजन वाहतुकीसाठी केलेल्या मॉडेलचे निती आयोगानेही कौतुक केले आहे. निती आयोगाने केलेल्या ट्विटमध्ये उत्तर प्रदेश सरकारने ऑक्सिजन मिळविण्यासाठी राबविलेल्या कोऑर्डिनेशन सिस्टीमचे कौतुक केले आहे. राज्यामध्ये २५० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. मात्र, आता उत्तर प्रदेशात ११०० मेट्रिक टन ऑक्सिजन दररोज उपलब्ध होत आहे.

     

    निती आयोगाने म्हटले आहे की, उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील ९० हजार खेड्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह नागरिकांना शोधून काढून आयसोलेट करण्यासाठी मोहीम राबविली. कोरोना बाधित आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांना शोधून काढण्यात आले. त्यामुळे वेळीच कोरोनाला आवर घालणे शक्य झाले.जागतिक आरोग्य संघटनेनेही उत्तर प्रदेश सरकारच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

    सरकारने कोरोना रुग्णांच्या सर्व्हेलन्स, ट्रेसींग आणि टेस्टींगमुळे संख्या मर्यादित राहिली. संशयित कोरोना रुग्णांना वेळीत उपचार मिलणे शक्य झाले. त्याचबरोबर उत्तर प्रदेश सरकारने पत्रकारांंना प्राधान्याने आणि मोफत कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले. राज्यामध्ये निर्बंधांची मुदत १७मे पर्यंत वाढविण्यात आली आहे.

    Yogi Adityanath did it, Corona positivity rate from 16.33 per cent to 4.8 per cent, Mumbai High Court appreciates suggestions for implementation of UP model in Maharashtra

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली