पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘जागतिक पर्यावरण दिनानिमित्त’ एका कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार आहेत.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 5 जून रोजी सकाळी 11 वाजता जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, यंदाच्या कार्यक्रमाची थीम “चांगल्या पर्यावरणासाठी जैवइंधनचा प्रसार करणे” अशी आहे. World Environment Day! Prime Minister Modi’s interaction with farmers on the occasion of ‘World Environment Day’ on ethanol-biogas use
या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी 2020 ते 2025 साठीचा इथेनॉल मिश्रित इंधन वापराचा तज्ज्ञ समितीचा अहवाल रोड मॅप प्रसिद्ध करतील. इथेनॉल आणि बायोगॅस वापरण्यासंबंधी शेतकऱ्यांचे अनुभव ऐकण्यासाठी ते शेतकर्यांशी संवाद साधणार आहेत.
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी ट्वीट केलंय, की “उद्या 5 जूनला सकाळी 11 वाजता जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘चांगल्या पर्यावरणासाठी जैवइंधनचा प्रसार करणे’ या थीमवर आधारीत कार्यक्रमात भाग घेणार आहे. यावेळी इथेनॉल आणि बायोगॅस वापरण्यासंबंधी शेतकऱ्यांचे अनुभव ऐकण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय, पर्यावरण मंत्रालय आणि वन व हवामान बदल मंत्रालय संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित करीत आहेत.
जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यासाठी भारत सरकारने (जीओआय) तेल कंपन्यांना 20 टक्क्यापर्यंत इथॅनॉल-मिश्रित पेट्रोल विक्री करण्यासंदर्भात ई -20 अधिसूचना जारी केली आहे.
World Environment Day! Prime Minister Modi’s interaction with farmers on the occasion of ‘World Environment Day’ on ethanol-biogas use
महत्त्वाच्या बातम्या
- केरळ सरकारचे 20 हजार कोटींचे कोविड पॅकेज, आरोग्य सेवा – लसीकरणावर लक्ष केंद्रित, कोणताही नवीन कर नाही
- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीडमध्ये उद्या मराठा क्रांती संघर्ष मोर्चाकडून एल्गार, विनायक मेटेंची माहिती
- निर्बंधांसह का असेना यावर्षी पायी वारी झालीच पाहिजे, भाजपची आध्यात्मिक आघाडी आक्रमक
- ठाकरे सरकारमध्ये एक मुख्यमंत्री अन् अनेक सुपर मुख्यमंत्री, अनलॉकच्या गोंधळावरून देवेंद्र फडणवीसांची टीका
- रामदेव बाबा यांचे अॅलोपॅथीबाबतचे वक्तव्य अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग ; दिल्ली उच्च न्यायालय