• Download App
    जे पी नड्डा यांच्या प्रचारसभेनंतर महिलांनी फाडले होर्डिंग्स ; म्हणाल्या - घरात चूल पेटवण्यासाठी कामाला येतील | The Focus India

    जे पी नड्डा यांच्या प्रचारसभेनंतर महिलांनी फाडले होर्डिंग्स ; म्हणाल्या – घरात चूल पेटवण्यासाठी कामाला येतील

    नड्डा यांची प्रचारसभा संपताच लोकांनी होर्डिंग्स उतरवले आणि आपल्यासोबत घेऊन गेले.यावेळी सिलेंडर महाग झाला असल्याने ही होर्डिंगची लाकडं चूल पेटवण्याच्या कामी येतील असं ते सांगत होते.Women tear down hoardings after JP Nadda’s campaign rally; Said – will come to work to light the stove in the house


    विशेष प्रतिनिधी

    उत्तर प्रदेश : गेल्या काही महिन्यांत सिलिंडरचे भाव चांगलेच वाढत चालले आहेत.त्यातही सबसिडीही जवळपास बंदच झाली आहे. सिलिंडर विकत घ्यायचा की, घरात किराणा भरायचा, असा प्रश्न लोकांसमोर उभा राहत आहे.दरम्यान घरगुती सिलेंडर महाग झाल्याचा प्रभाव आता भाजपाच्या प्रचारसंभांमध्येही दिसू लागला आहे.मंगळवारी (२८ डिसेंबर ) उत्तर प्रदेशातील हापुड येथे भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांची प्रचारसभा पार पडली. यावेळी भाजपा नेत्यांनी लाखो रुपये खर्च करुन तिथे मोठमोठे होर्डिंग लावण्यात आले होते.



    दरम्यान नड्डा यांची प्रचारसभा संपताच लोकांनी होर्डिंग्स उतरवले आणि आपल्यासोबत घेऊन गेले.यावेळी सिलेंडर महाग झाला असल्याने ही होर्डिंगची लाकडं चूल पेटवण्याच्या कामी येतील असं ते सांगत होते.

    तेथील एका महिलेला हा सगळा प्रकार विचारला असता तिने सांगितलं की, “आम्ही मजूर आहोत.भाड्याच्या घरात आम्ही राहतो. सिलेंडर १००० रुपये महाग असल्याने तो परवडत नाही”. सिलेंडर परवडत नसल्याने किमान ही लाकडं वापरत जेवण तरी बनवू असं सांगत या महिलांने त्यांची परिस्थिती व्यक्त केली.

    Women tear down hoardings after JP Nadda’s campaign rally; Said – will come to work to light the stove in the house

    Related posts

    Cockroach Janata Party : कॉकरोच जनता पार्टीचे 5 दिवसांत 60 लाख फॉलोअर्स; जाहीरनामा प्रसिद्ध- महिलांना 50% आरक्षण, CJI ना राज्यसभेवर पाठवणार नाही

    NEET Re-Exam : नीट फेर-परीक्षेपूर्वी बनावट टेलिग्राम चॅनेलवर कारवाई; शिक्षणमंत्री म्हणाले- त्वरित ब्लॉक करा; पेपरफुटी प्रकरणात 5 आरोपींना तुरुंगात पाठवले

    राष्ट्रवादीत संघर्ष, फडणवीस यांची भेट; त्यानंतर कोळी टोपी घालून सुनील तटकरे नितेश राणेंबरोबर एकाच रथात मिरवणुकीत!!