• Download App
    Women reservation and dlimitation bills failed in Lok Sabha महिला आरक्षण आणि परिसीमन विधेयक दोन तृतीयांश बहुमताअभावी नामंजूर; मोदी सरकारच्या प्रयत्नांना विरोधकांचा खोडा!!

    महिला आरक्षण आणि परिसीमन विधेयक दोन तृतीयांश बहुमताअभावी नामंजूर; मोदी सरकारच्या प्रयत्नांना विरोधकांचा खोडा!!

    Women reservation

    नाशिक : महिला आरक्षण आणि लोकसभा – विधानसभांचे परिसीमन म्हणजेच सदस्य संख्यावाढ ही विधेयके लोकसभेने आज दोन तृतीयांश बहुमताच्या अभावी नामंजूर केली. महिलांना 33 % आरक्षण देण्याच्या मोदी सरकारच्या प्रयत्नांना काँग्रेस सकट सगळ्या विरोधकांनी आज लोकसभेतून खोडा घातला. लोकसभा सदस्यांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या आधारे विधेयकाच्या बाजूने 278 मते दिली, तर विरोधात 211 मते दिली, तर बाकीच्या खासदारांनी मतदान चिठ्ठीद्वारे मतदान केले. त्यामुळे एकूण मतदानापैकी 298 मते विधेयकाच्या बाजूने पडली तर 230 मते विधेयकाच्या विरोधात पडली. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अंतिम आकडेवारी जाहीर करून विधेयके दोन तृतीयांश बहुमताच्या अभावी नामंजूर झाल्याचे जाहीर केले. लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येचा विचार करता दोन तृतीयांश बहुमत म्हणजे किमान 360 सदस्यांनी विधेयकाच्या बाजूने मतदान करायला हवे होते पण फक्त 298 खासदारांनीच विधेयकाच्या बाजूने मतदान केल्याने मोदी सरकारच्या प्रयत्नांवर पाणी फेरण्यात विरोधकांना यश मिळाले.Women reservation and dlimitation bills failed in Lok Sabha

    सगळ्या संसद सदस्यांनी आपल्या विवेक बुद्धीच्या आधारे मतदान करावे असे आवाहन नरेंद्र मोदींनी आज सकाळीच केले होते. त्यानंतर आज दिवसभर लोकसभेचे कामकाज चालले त्यामध्ये एकूण 130 सदस्यांनी चर्चेत प्रत्यक्ष सहभाग नोंदविला यापैकी 56 महिला खासदारांनी आपली मते चर्चेद्वारे नोंदवली.



    – राहुल गांधींनी घालविले चर्चेतले गांभीर्य

    राहुल गांधींनी जादूगाराची गोष्ट सांगून चर्चेतले गांभीर्य घालविले. पण त्यांना सुद्धा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बाकीच्या तुमच्या पक्षाच्या ज्येष्ठ खासदारांकडून शिकला नाहीत तर निदान प्रियांका गांधींकडून तरी संसदीय भाषण करायला शिका, असा टोमणा मारला.

    – विरोधकांची एकजूट दिसली

    लोकसभेत सरकारच्या बाजूने दोन तृतीयांश बहुमत नाही, हे सरकारला माहिती असूनही त्यांनी ही विधेयके आणून राजकीय खेळ केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. राहुल गांधींच्या प्रभावाखालीच काँग्रेसच्या खासदारांनी संबंधित विधेयकांच्या विरोधात मतदान केले. काँग्रेसच्या एकूण 99 खासदारांनी विधेयकाला विरोध केला. त्याचबरोबर बाकीच्या रोजी पक्षांच्या एकूण 131 खासदारांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केले.

    विरोधात मतदान करणाऱ्या खासदारांना देशातल्या महिला मतदार विसरणार नाहीत आणि त्यांना माफ करणार नाही, असा इशारा अमित शाह यांनी आपल्या भाषणादरम्यान दिला होता. पण विरोधी खासदारांवर अमित शाह यांच्या भाषणाचा परिणाम झाला नाही. त्यांनी ठरवूनच संबंधित विधेयकांच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे विरोधकांची लोकसभेतली शक्ती 230 असल्याचे उघड झाले.

    – फ्लोअर मॅनेजमेंट नव्हते

    संबंधित विधेयके मंजूर करवून घेण्यासाठी मोदी सरकारने फारसे फ्लोअर मॅनेजमेंट केले नव्हते. सरकारने सर्वपक्षीय बैठक देखील घेतली नव्हती. विरोधक संबंधित विधेयकांच्या विरोधात मतदान करणार आहेत हे सरकारला माहिती होते, पण लोकसभेतल्या भाषणांखेरीज बाकी कुठल्या मार्गांनी सरकारमधील मंत्र्यांनी विरोधकांना पटविण्याचा देखील प्रयत्न केला नव्हता. तरीसुद्धा विधेयकांच्या बाजूने 298 मते मिळविण्यात मोदी सरकार यशस्वी ठरले. अर्थात हे मतदान सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्याच खासदारांचे होते. आजच्या मतदानाचा परिणाम पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू विधानसभांच्या निवडणुकांच्या मतदानांवर होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

    Women reservation and dlimitation bills failed in Lok Sabha

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    राहुल गांधींनी लिहिले, भारत ने देख लिया, INDIA ने रोक दिया!!; पण लाडक्या बहिणींचा कसा आणि कुठे बसेल फटका??

    Delhi Airport : दिल्ली विमानतळावर अकासा एअर आणि स्पाइसजेटची विमाने धडकली; विमानांचे नुकसान पण प्रवासी सुरक्षित

    राहुल गांधींचे ब्रिटिश आणि भारतीय दुहेरी नागरिकत्व; अलाहाबाद उच्च न्यायालयाचे FIR दाखल करण्याचे आदेश, CBI चौकशी करा!!