विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राहुल गांधींच्या या वागण्यावर मी त्यांना काही बोललो तर तेलंगणाचे मुख्यमंत्री भडकले. पण जेव्हा राहुल गांधी लष्कराबाबत बोलले होते तेव्हा हे लोक का पेटून उठले नाहीत. या लोकांनी का ट्विट केलं नाही,असा सवाल आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी केला आहे.When Rahul Gandhi spoke about the army, why didn’t people get angry, questioned the Chief Minister of Assam
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केल्याप्रकरणी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी टीका केली आहे. यावर उत्तर देताना सरमा म्हणाले, एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की लष्कराचा अपमान करणे किंवा त्यांच्याकडे सर्जिकल स्ट्राईकबाबत पुरावा मागणं यापेक्षा मोठा गुन्हा कोणताच असू शकत नाही.
राहुल गांधींच्या या वागण्यावर मी त्यांना काही बोललो तर तेलंगणाचे मुख्यमंत्री भडकले. पण जेव्हा राहुल गांधी लष्कराबाबत बोलले होते तेव्हा हे लोक का पेटून उठले नाहीत. या लोकांनी का ट्विट केलं नाही. गांधी कुटुंबाला तुम्ही काही बोलू शकत नाही पण बाकी सर्वकाही करता येतं, हे ही मानसिकता देशातून जायला हवी.
देशाला लोकशाहीवादी व्हावं लागेल, गांधी कुटुंबियांवर देखील टीका करण्याची हिंमत आता देशाला बाळगायला हवी. गांधी कुटुंबानं खुलेपणानं लष्करावर टीका केली, दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्यावरही टीका केली. पण या कुटुंबाला कोणी जबाबदार धरलं नाही. पण भारत आता बदलला आहे आणि इथं गांधी कुटुंबही जबाबदारीच्या परिघात आहे. त्यांनाही विविध गोष्टींना जबाबदार धरता यायला हवे.
When Rahul Gandhi spoke about the army, why didn’t people get angry, questioned the Chief Minister of Assam
महत्त्वाच्या बातम्या
- Vaccination : ५-१५ वर्षांच्या बालकांच्या लसीकरणाबाबत आरोग्यमंत्र्यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले- तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार निर्णय घेणार
- भन्नाट उद्योजक महिंद्रा : कंटाळलेल्या सुरक्षारक्षकाने ७ कोटींच्या चित्रावर बॉल पेनने काढले डोळे-गमावली नौकरी मात्र आनंद महिंद्रा म्हणतात… Why Worry ?
- पश्चिम बंगाल पाठोपाठ गोव्यातही शरद पवारांची प्रचाराला हुलकावणी!!; ते उत्तर प्रदेशात जातील??
- सर्व रेल्वेंमध्ये सुरू होणार केटरिंग सेवा : १४ फेब्रुवारीपासून सर्व ट्रेनमध्ये मिळेल गरम जेवण, प्रवाशांना मिळणार सुविधा