• Download App
    पेगासस हेरगिरी प्रकरणात पश्चिम बंगाल सरकारचा चौकशी आयोग, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधिश मदन लोकूर, ज्योतिर्मय भट्टाचार्य यांची समिती|West Bengal government inquiry commission in Pegasus espionage case, committee of former Supreme Court judge Madan Lokur, Jyotirmoy Bhattacharya

    पेगासस हेरगिरी प्रकरणात पश्चिम बंगाल सरकारचा चौकशी आयोग, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधिश मदन लोकूर, ज्योतिर्मय भट्टाचार्य यांची समिती

    विशेष प्रतिनिधी

    कोलकत्ता: पश्चिम बंगालच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी पेगासस हेरगिरी प्रकरणात फोन टॅपिंगच्या मुद्द्यावर चौकशी आयोग नेमण्याचा निर्णय घेतला. पेगाससच्या नावाखाली देशातील सर्व नेते आणि न्यायाधीशांसह सर्वांनाच नजरकैद करण्यात आलेलं आहे.West Bengal government inquiry commission in Pegasus espionage case, committee of former Supreme Court judge Madan Lokur, Jyotirmoy Bhattacharya

    याची केंद्राकडून दखल घेतली जाईल आणि सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून याची चौकशीचा निर्णय सरकार घेईल अशी अपेक्षा होती. पण केंद्रानं तसं काहीच केलं नाही, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.कोलकाता हायकोटार्चे माजी न्यायाधीश जोतिर्मय भट्टाचार्य आणि न्यायाधीश मदन भीमराव लोकुर यांच्या नेतृत्वाखाली पेगासस प्रकरणाची चौकशी केली जाईल



    आणि नेमकं कोण व कशापद्धतीनं हॅकिंग केलं जात आहे याचा तपास लावला जाईल, असं ममतांकडून सांगण्यात आलं आहे.ममता बॅनर्जी यांनी पेगासस प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारित एक समिती नेमून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती.

    माज्या आवाहनानंतरही केंद्र सरकारनं याबाबत कोणतंही पाऊल उचललं नाही. त्यामुळे आज चौकशी आयोगाचा निर्णय घ्यावा लागत आहे. आमचे फोन आज टॅप होत आहेत. हे एका रेकॉर्डरसारखं आहे. विरोधी पक्षातील सर्व नेत्यांना याची कल्पना आहे की फोन टॅपिंग सुरू आहे, असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

    West Bengal government inquiry commission in Pegasus espionage case, committee of former Supreme Court judge Madan Lokur, Jyotirmoy Bhattacharya

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Longest serving PM : नरेंद्र मोदी, सेवारत जन स्वधर्म तत्पर!!

    Mamata Banerjee : टीएमसीत बंडानंतर ममता बॅनर्जींची मोठी चाल; कल्याण बॅनर्जी लोकसभेचे मुख्य व्हिप, पण पेच कायम

    PM Narendra Modi : मोदी सलग सर्वाधिक काळ निवडलेले पंतप्रधान; नेहरूंचा 4398 दिवसांचा विक्रम मोडला; आज एनडीएतील घटक पक्षांना संबोधित करणार