• Download App
    कलम ३७० रद्द केले तसेच पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरला स्वतंत्र करू, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचा निर्धार|We will make Pakistan-occupied Kashmir independent, says Union Minister Jitendra Singh

    कलम ३७० रद्द केले तसेच पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरला स्वतंत्र करू, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचा निर्धार

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: ज्या पद्धतीने केंद्रातील मोदी सरकारने कलम ३७० रद्द केले त्याच प्रमाणे सरकार पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरला स्वतंत्र्य करण्याचा संकल्प पूर्ण करेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केला आहे. ‘द कश्मीर फाइल्स’वरुन सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्धार व्यक्त केला आहे.We will make Pakistan-occupied Kashmir independent, says Union Minister Jitendra Singh

    जम्मू-काश्मीर राज्याचे संस्थापक महाराज गुलाब सिंह यांच्या २० फुट उंचीच्या प्रतिमेचे अनावरण केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जितेंद्र सिंह यांनी १९९० साली काश्मीर खोऱ्यात काश्मीरी पंडितांवर झालेल्या अन्यायावर आधारीत ‘द कश्मीर फाइल्स’वर टीका करणाऱ्या नॅशनल कॉन्फरन्सवर हल्ला चढवला.



    त्यांनी दावा केली की १९८७ साली विधानसभा निवडणुकीत झालेल्या गैरव्यवहारामुळे जम्म-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना थारा मिळाला. ते म्हणाले, १९९४ साली संसदेने जो प्रस्ताव पारित केला आहे तोच आमचा संकल्प आहे. १९९४ साली संसदेत आवाजी मतदानाद्वारे प्रस्ताव पारित करण्यात आला होता की, पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या जम्मू-काश्मीरचा भाग सोडून द्यावा लागेल.

    पाक व्याप्त काश्मीरला स्वतंत्र्य करण्याचा आमचा संकल्प आहे. याआधी भाजपने कलम ३७० रद्द करण्याचे आश्वासन दिले होते आणि ते आम्ही पूर्ण केले. ही गोष्ट काहींच्या स्वप्नात देखील नव्हती. अशाच पद्धतीने १९८० साली माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी अंदाज वर्तवला होता की भाजपचा शानदार विजय होईल, ती गोष्ट देखील लोकांच्या कल्पनेच्या पलिकडची होती.

    We will make Pakistan-occupied Kashmir independent, says Union Minister Jitendra Singh

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार