• Download App
    आरेला कारेनेच उत्तर देऊ, पण शिवसेना भवन फोडण्याबाबत वक्तव्य केले नाही, आमदार प्रसाद लाड यांनी केले स्पष्ट|We will answer them, but did not make a statement about demolishing Shiv Sena Bhavan, MLA Prasad Lad clarified

    आरेला कारेनेच उत्तर देऊ, पण शिवसेना भवन फोडण्याबाबत वक्तव्य केले नाही, आमदार प्रसाद लाड यांनी केले स्पष्ट

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: जेव्हा जेव्हा आरे ला कारे होईल तेव्हा कारेला आरेचे उत्तर दिलं जाईल. परंतु ज्या शिवसेनाप्रमुखांवर आम्ही प्रेम करतो. कुठल्याही पक्षात असलो तरी शिवसेनाप्रमुखांबद्दल आम्ही आदर ठेवतो. त्या शिवसेना प्रमुखांच्या शिवसेना भवन बद्दल माझ्याकडून तरी कुठलही चुकीचे वक्तव्य केले जाणार नाही, असे भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी स्पष्ट केले आहे.We will answer them, but did not make a statement about demolishing Shiv Sena Bhavan, MLA Prasad Lad clarified

    वेळ आली तर शिवसेना भवन फोडू असे वक्तव्य लाड यांनी केल्याचा आरोप केला जात आहे. प्रसाद लाड यांनी त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा करताना म्हटले आहे की, आज प्रसारमाध्यमातून माझ्या एका भाषणाचा विपर्यास करुन मी शिवसेना भवन फोडणार अशा बातम्या वृत्तपत्र आणि माध्यमांमधून दिसायला लागल्या.



    परंतु या गोष्टीचं फार स्पष्टपणे स्पष्टीकरण करु इच्छितो की भिण्याचं कुठलंही कारण नाही. जेव्हा जेव्हा आरे ला कारे होईल तेव्हा कारेला आरेचं उत्तर दिलं जाईल. परंतु ज्या शिवसेनाप्रमुखांवर आम्ही प्रेम करतो, कुठल्याही पक्षात असलो तरी शिवसेनाप्रमुखांबद्दल आम्ही आदर ठेवतो.

    त्या शिवसेना प्रमुखांच्या शिवसेना भवन बद्दल माझ्याकडून तरी कुठलेही चुकीचे वक्तव्य केले जाणार नाही. माझे स्पष्ट म्हणणे होते की, माहिममध्ये जेव्हा येतो तेव्हा एवढा पोलीस बंदोबस्त ठेवला जातो की जणूकाही आम्ही शिवसेना भवनच फोडायला जाणार आहोत. ती बातमी विपर्यास करून दाखवली आहे. माझे हे स्पष्टीकरण आहे,

    मला कुठल्याही प्रकारे शिवसेना प्रमुख आणि शिवसेना प्रमुखांनी बाधलेल्या वास्तूचा अनादर करायचा नव्हता. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो.
    लाड म्हणले होते की, नारायण राणे आणि राणे कुटुंबीयांना मानणारा स्वाभिमानचा एक खूप मोठा गट आज राणे साहेबांच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीमध्ये आलाय.

    त्यामुळे भारतीय जनता पाटीर्ची ताकद निश्चितपणे डबल झाली आहे. त्यामुळे नितेशजी पुढच्या वेळेस कार्यकर्ते कमी आणुयात, कारण आपण आलो की पोलिसच खूप येतात. फक्त त्यांना सांगुयात की ड्रेसमध्ये पाठवू नका म्हणजे त्यांना हॉलमध्ये बसता येईल. एवढी तुमची आमची भीती, यांना असे वाटते की हे माहिम मध्ये आले की सेनाभवन फोडणार आहेत.

    We will answer them, but did not make a statement about demolishing Shiv Sena Bhavan, MLA Prasad Lad clarified

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    शरद पवार यांचा इशारा, शशिकांत शिंदेंना अटक सहन होणार नाही; अवघा महाराष्ट्र पेटून उठेल

    राजकारणात मुरलेले पवार काका – पुतण्या “जे” टाळू शकले नाहीत, “ते” तरुण वरूण गांधींनी टाळून दाखविले!!

    हेमंत सोरेन यांना पुन्हा धक्का! ED कोर्टाने फेटाळला अंतरिम जामीन