वृत्तसंस्था
नवी दिल्ली : काँग्रेस कार्यकारिणीची आजची बैठक बरीच वादळी ठरली आहे. काँग्रेस नेत्यांनी कटू सत्याला सामोरे जावे. आपला निवडणूकीत दारूण पराभव का झाला याचे आत्मपरिक्षण करावे,We need to candidly understand why in Kerala & Assam we failed to dislodge incumbent govts, asks sonia gandhi in CWC meeting
अशा कानपिचक्या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्या आहेत… पण त्याचवेळी कटू सत्य त्या कोणाला स्वीकारायला सांगत आहेत आणि आत्मपरिक्षण त्या कोणाला करायला सांगत आहेत, याचीही चर्चा दबक्या आवाजात काँग्रेसमध्ये सुरू झालेली दिसत आहे.
काँग्रेस कार्यकारिणीची विस्तृत बैठक सध्या ऑनलाइन सुरू आहे. सोनिया गांधींचे यात सुरूवातीलाच भाषण झाले. यानंतर काँग्रेस अध्यक्षांच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. ही निवडणूक प्रक्रिया जून अखेरीपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
तत्पूर्वी, सोनिया गांधींनी ५ राज्यांच्या निवडणूकीतील काँग्रेसच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त करून काँग्रेस नेत्यांना खडे बोल सुनावलेत. त्या म्हणाल्या, आसाम आणि केरळमध्ये आपण विद्यमान सरकारांना म्हणजे भाजप आणि डाव्यांच्या सरकारांचा का पराभव करू शकलो नाही,
याचा विचार केला पाहिजे. कटू सत्याला सामोरे गेले पाहिजे. पश्चिम बंगालमध्ये तर काँग्रेस भोपळाही फोडू शकली नाही. हा आपल्याला अस्वस्थ करणारा धडा आहे
आणि त्यातून आपण काही शिकलो नाही तर आपल्याला यापुढची वाटचाल कशी करायची हे देखील कळणार नाही. निवडणूकीतील अपयश पचवून पुढे गेले पाहिजे.
सोनिया गांधींचे हे भाषण काँग्रेस नेत्यांना कानपिचक्या होते. पण पाचही राज्यांमधली काँग्रेसच्या प्रचाराची धूरा तर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी वाहिली होती.
त्यात त्यांना अपयश आले. मग त्यांना कानपिचक्या देण्याऐवजी ऐवजी सगळ्या काँग्रेस नेत्यांना का उपदेश… असा प्रश्न काँग्रेसजन दबक्या आवाजात विचारत आहेत.
We need to candidly understand why in Kerala & Assam we failed to dislodge incumbent govts, asks sonia gandhi in CWC meeting
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना हे जैविक शस्त्र, चिनी शास्त्रज्ञांकडून 2015 पासून संशोधन, ऑस्ट्रेलियन माध्यमांच्या दाव्याने जगभरात खळबळ
- गोव्यात चित्रपट, मालिकांच्या शूटिंगवर बंदी; हिंदी, मराठी मालिका सापडल्या संकटात
- कोरोना लसीवरील बौद्धीक संपदा हक्क रद्द करण्याच्या निर्णयाकडे लागले साऱ्या जगाचे लक्ष
- वैज्ञानिक आधारसह, वेगवान लसीकरणाशिवाय भारतात कोरोनाचा अटकाव अशक्य, लॅन्सेटने घेतली गंभीर दखल
- पश्चिम बंगालनंतर भाजपला आता उत्तर प्रदेशात घेरण्याची शेतकरी नेत्यांची रणनीती