वृत्तसंस्था
अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या मातोश्री हीराबेन यांच्या वाढदिवसानिमित्त अहमदाबादला पोहोचले आहेत. पंतप्रधानांनी त्यांच्या आईचे पाय धुतले, त्यानंतर ते पाणी त्यांच्या डोळ्यांना लावले. मोदींनी आईसमोर बसून पूजा केली, आईला शाल पांघरून आशीर्वाद घेतले. पंतप्रधान मोदींच्या आईनेही वाढदिवसानिमित्त भेटायला आलेल्या आपल्या मुलाचे तोंड गोड केले.WATCH VIDEO PM Narendra Modi went to visit his mother on the occasion of her birthday In Ahmedabad
पंतप्रधान मोदींच्या आई हिराबेन आज 100व्या वर्षात पदार्पण करत आहेत.
गुजरातमध्ये मातृशक्ती योजनेची सुरुवात
शनिवारी पावागड येथील महाकालीचे दर्शन घेतल्यानंतर मोदी हे हेरिटेज वनातील लोकांची भेट घेणार आहेत. त्यानंतर वडोदराला रवाना झाले. तेथे ‘गुजरात गौरव अभियान’ कार्यक्रमांतर्गत विविध विभागांच्या 500 कोटींहून अधिक खर्चाच्या प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमात ते ‘मुख्यमंत्री मातृशक्ती योजना’ (MMY) लाँच करणार आहेत.
गरोदरपणाच्या पहिल्या 1000 दिवसांपासून ते मातृत्वाच्या पहिल्या 1000 दिवसांपर्यंत माता आणि बाळ दोघांनाही पौष्टिक आहार मिळावा आणि त्यांची पोषण स्थिती सुधारावी या उद्देशाने गुजरात सरकारने ‘मुख्यमंत्री मातृशक्ती योजना’ जाहीर केली आहे.
WATCH VIDEO PM Narendra Modi went to visit his mother on the occasion of her birthday In Ahmedabad
महत्वाच्या बातम्या
- जम्मू-काश्मिरात लवकरच विधानसभा निवडणुका : राजनाथ म्हणाले- परिसीमन पूर्ण, निवडणूक प्रक्रिया वर्षअखेरीस सुरू होण्याची शक्यता
- द फोकस एक्सप्लेनर : चिदंबरम यांच्या कायद्याच्या कचाट्यात कसे अडकले राहुल-सोनिया गांधी, CBI आणि NIA पेक्षाही ED कशी भारी? वाचा सविस्तर…
- हिराबा 100 : शतायु मातेचे पंतप्रधानाकडून पाद्यपूजन, तीर्थ मस्तकी धारण!!
- अग्निपथ विरोधातील अग्निकांड : मोदींवर हल्ल्याचे, संपूर्ण देश पेटवण्याचे “बॉयकॉट टूर ऑफ ड्युटी”चे टूलकिट!!