Ahmedabad : अहमदाबादमध्ये फटाक्यांच्या कारखान्याला आग, 9 जणांचा मृत्यू; 15 जखमी; आरएएफ जवानांनी घटनास्थळी पोहोचून लोकांना वाचवले
शनिवारी अहमदाबादच्या वस्त्राल भागातील एका बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटामुळे आग लागली. या दुर्घटनेत तीन मुलांसह नऊ जणांचा मृत्यू झाला. सुमारे १५ जण जखमी झाले.