• Download App
    Mamata Banerjee ममता बॅनर्जींची कोलकात्यात गॅस टंचाई विरोधात रॅली की तृणमूल काँग्रेसची प्रचार रॅली??

    ममता बॅनर्जींची कोलकात्यात गॅस टंचाई विरोधात रॅली की तृणमूल काँग्रेसची प्रचार रॅली??

    नाशिक : ममता बॅनर्जींची कोलकत्यात गॅस टंचाई विरोधात राहिली की तृणमूल काँग्रेसची प्रचार रॅली??, असा सवाल आज ममता बॅनर्जी यांच्याच राजकीय हालचालींमुळे समोर आला. Mamata Banerjee

    निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल मध्ये कालच विधानसभेची निवडणूक जाहीर केली. त्यामुळे राज्यात आचारसंहिता लागू झाली. अर्थातच प्रत्येक राजकीय व्यक्तीच्या राजकीय हालचालींवर कायदेशीर बंधने आली. प्रत्येक राजकीय व्यक्तीच्या राजकीय घटना घडामोडींचा खर्च निवडणूक आयोगाकडे नोंदणी अपरिहार्य झाले.

    – नियम धाब्यावर बसवून रॅली

    पण ममता बॅनर्जी यांनी सगळे नियम धाब्यावर बसवून कोलकत्त्यामध्ये रॅली काढली. पण ती रॅली काढताना ममता बॅनर्जी यांनी वेगळीच राजकीय शैली वापरली. किंबहुना राजकीय ढोंग केले. त्यांनी आपण गॅस टंचाईच्या विरोधात रॅली काढतो आहोत, असे भासविले. त्यांच्याबरोबरच तृणमूल काँग्रेसच्या हजारो कार्यकर्त्यांनी गळ्यात गॅस सिलेंडरची पोस्टर्स अडकवून रॅलीमध्ये भाग घेतला.

    – ममता बॅनर्जींची बॉडी लँग्वेज

    पण या रॅलीमध्ये ममता बॅनर्जी ज्या पद्धतीने लोकांना नमस्कार करत त्यांच्याकडे पाहून हात हलवत चालल्या होत्या, ते पाहता ममता बॅनर्जी यांनी काढलेली रॅली गॅस टंचाईच्या विरोधात नसून ती प्रत्यक्षात तृणमूळ काँग्रेसच्या प्रचाराची रॅली होती, हेच राजकीय सत्य दिसून आले. कारण ममता बॅनर्जी यांच्या चेहऱ्यावर गॅस टंचाईचा कुठलाही तणाव नव्हता. उलट त्या लोकांकडे बघून हसत नमस्कार करत होत्या आणि हात हलवून त्यांना अभिवादन करत होत्या.

    – निवडणूक आयोगाने दखल घेणे अपेक्षित

    गॅस टंचाईच्या विरोधात काढलेल्या रॅलीच्या निमित्ताने ममता बॅनर्जी यांनी तृणमूळ काँग्रेसचा निवडणुकीतला प्रचार करून घेतला. कारण यामध्ये कार्यकर्त्यांच्या गळ्यात जशी गॅस सिलेंडरची पोस्टर्स होती, त्याचवेळी त्यांच्या हातात तृणमूळ काँग्रेसचे झेंडे होते. पण निवडणूक आयोगाने या रॅलीची दखल घेऊन कुठली कारवाई केली, की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण निवडणूक आयोगाने या रॅलीची दखल घेणे मात्र अपेक्षित आहे.

    Was Mamata Banerjee’s rally in Kolkata against the gas shortage, or a Trinamool Congress campaign rally?

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Nepal : नेपाळमध्ये भारतीय यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, 7 जणांचा मृत्यू, 7 जखमी

    Dattatreya Hosabale : दत्तात्रेय होसबळे म्हणाले- इराण युद्धावर भारताची भूमिका योग्य:पानिपतमध्ये म्हणाले- भाजपने RSS ची विचारधारा स्वीकारली, इतरांनी दरवाजे बंद केले

    Indian Markets : परदेशी गुंतवणूकदारांनी 15 दिवसांत भारतीय बाजारातून ₹52,704 कोटी काढले