विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – पंजाब काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात राजकीय युद्ध थांबण्याची कोणतीच चिन्हे दिसेनाशी झाली आहेत. आता सिद्धू यांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेत पक्षनेतृत्वाने मला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्यावे. अन्यथा सडेतोड उत्तर देऊ असे म्हटले आहे.War of word once again started in Punjab congress
सिद्धू यांनी पूर्वीच मला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्या, मी पुढील वीस वर्षे काँग्रेसला सत्तेत ठेवतो. त्यासाठी मी आराखडा तयार केल्याचे सांगितले होते. पंजाब विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच तेथे काँग्रेस पक्षांतर्गत राजकारण विकोपाला जाण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच आता सिद्धू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
सिद्धू यांच्या सल्लागारांनी काश्मीार प्रकरणी वादग्रस्त विधान केल्याने त्यांना पक्षाकडून समज देण्यात आली. हरिश रावत यांनी मात्र त्यांना हटविण्याची सूचना केली होती. त्यांनतर मलविंदर सिंग यांनी सल्लागार पद सोडले आहे. त्या पार्श्वभूमीवर सिद्धू यांनी आज आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी म्हटले आहे, की पक्षाने मला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. अन्यथा मला स्पष्टपणे बोलावे लागेल.
War of word once again started in Punjab congress
महत्त्वाच्या बातम्या
- अमेरिकेने तुरुंगात डांबलेला झाकिर संरक्षण मंत्री, तालिबानचा सहसंस्थापक बरादर होणार अफगाणिस्तानचा नवा अध्यक्ष
- पोलिस अधिकाऱ्यांना राजकीय पक्षांनी लक्ष्य करणे धक्कादायक, सरन्यायाधीश रमणा यांचे मत
- प्रताप सरनाईकांचा मुख्यमंत्र्यांवरील राग जाईना, म्हणाले केंद्र आणि राज्याच्या भांडणात माझा बळी
- अविवाहित जोडप्यांना बागेमध्ये जाण्यासच बंदी, तालीबानी आदेश मागे घेण्याची नामुष्की