• Download App
    West Bengal पश्चिम बंगाल मध्ये मतदान, मोदींची काशी विश्वनाथ मंदिरात पूजा; राहुल गांधींचे निकोबार बेटावर गुरुद्वारात दर्शन

    पश्चिम बंगाल मध्ये मतदान, मोदींची काशी विश्वनाथ मंदिरात पूजा; राहुल गांधींचे निकोबार बेटावर गुरुद्वारात दर्शन

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : पश्चिम बंगाल विधानसभेच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यात १४९ मतदारसंघात आज मतदान सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन पूजा केली. त्यांनी तिथे विक्रमादित्य वैदिक घड्याळ देखील पाहिले. त्याच वेळी राहुल गांधींनी मात्र अंदमान निकोबार मधील निकोबार बेटावर जाऊन तिथल्या गुरुद्वारात दर्शन घेतले. West Bengal

    पश्चिम बंगाल मध्ये विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात ९४ % एवढे प्रचंड विक्रमी मतदान झाल्यानंतर आज दुसऱ्या टप्प्यात १४९ मतदारसंघात मतदान सुरू आहे. राज्यातून तुरळक हिंसाचाराच्या बातम्या सुद्धा आल्या आहेत. पण नागरिक निर्भयपणे मतदान करत असल्याचे दिसून येते आहे. बंगाली पोलिस आणि केंद्रीय राखीव दलाचे जवान नागरिकांना मदत करत आहेत.

    – वैदिक घड्याळाची पाहणी

    बंगाल मधल्या आजच्या मतदानाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी मध्ये विश्वनाथ मंदिरात जाऊन पूजा केली. त्यानंतर त्यांनी विक्रमादित्य वैदिक घड्याळ देखील पाहिले. त्याची व्यवस्थित माहिती घेतली.

    – राहुल गांधींची निकोबार बेटाला भेट

    याच दिवशी राहुल गांधींनी निकोबार बेटावर जाऊन तिथल्या गुरुद्वारात दर्शन घेतले. त्याआधी त्यांनी निकोबार मध्ये विकास प्रकल्पांच्या नावाखाली तिथल्या जंगलांचा ऱ्हास होत असल्याचा आरोप केला. निकोबार बेटावर विकास करताना तिथली जंगले तोडली जात आहेत. तिथे भ्रष्टाचार सुरू आहे. १६० चौरस किलोमीटरचे पर्जन्य अरण्य धोक्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला.

    Voting Underway in West Bengal; Modi Offers Prayers at Kashi Vishwanath Temple

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    auto-taxi : ऑटो-टॅक्सी चालकांसाठी नवा फॉर्म्युला; एक मेपासून राज्यात मोहिम, समिती स्थापन; चालकांना अप्रत्यक्षपणे 6 महिन्यांची मुदत

    Pakistan : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला, 7 जणांचा मृत्यू:75 जखमी

    राहुल गांधींचा ममतांच्या विरुद्ध जोरात प्रचार; पण भाई जगतापांचा ममतांनाच कौल!!