Monday, 5 May 2025
  • Download App
    निवडणूक रणनीतीकार म्हणून सन्यास घेणारे प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीला ; कारण गुलदस्त्यात!। Visiting Prashant Kishor Sharad Pawar, who has retired as an election strategist; Because in the bouquet!

    निवडणूक रणनीतीकार म्हणून सन्यास घेणारे प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीला ; कारण गुलदस्त्यात!

    प्रशांत किशोर हे आधी मोदींसोबत काम करत होते. नंतर त्यांनी पंजाब, बिहारमध्येही स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम पाहिलं. ममता बॅनर्जींचा विजयही त्यांनी सोपा केला. त्याच पार्श्वभूमीवर ते आता शरद पवारांना भेटत आहेत. Visiting Prashant Kishor Sharad Pawar, who has retired as an election strategist; Because in the bouquet!


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विजयात मोलाची भूमिका बजावणारे प्रशांत किशोर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेणार आहेत. आज सकाळी ११ वाजल्याच्या दरम्यान प्रशांत किशोर शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी त्यांची भेट घेणार आहेत. या भेटीमागचं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

    प्रशांत किशोर आणि शरद पवार भेटणार म्हणजे कुठल्या तरी निवडणुकांचीच तयारी असणार हे निश्चित. प्रशांत किशोर हे आधी मोदींसोबत काम करत होते. नंतर त्यांनी पंजाब, बिहारमध्येही स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम पाहिलं. ममता बॅनर्जींचा विजयही त्यांनी सोपा केला. त्याच पार्श्वभूमीवर ते आता शरद पवारांना भेटत आहेत. त्यामुळे ह्या भेटीची मोठी उत्सुकता आहे

    काही दिवसांपूर्वी दिल्ली दौऱ्यावर गेलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेली भेट आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदीन कार्यक्रमात शरद पवारांनी भविष्यकाळात महाविकास आघाडीबद्दल केलेलं वक्तव्य या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांच्या आजच्या भेटीला महत्व प्राप्त झालं आहे. शिवसेनेसोबत आपण कधी सरकार बनवू असं वाटलं नव्हतं, शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष आहे असं वक्तव्य पवार यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापनदीन कार्यक्रमात केलं होतं.



    २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत नरेंद्र मोदी यांच्या विजयात मोलाची भूमिका बजावल्यानंतर प्रशांत किशोर पहिल्यांदा चर्चेत आले. यानंतर किशोर यांनी पंजाब आणि बिहारमध्येही स्ट्रॅटजिस्ट म्हणून काम केलं होतं. यानंतर ममता बॅनर्जींच्या विजयातही किशोर यांनी मोलाची भूमिका बजावली होती. या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यातली भेट ही महत्वपूर्ण मानली जात आहे.

    निवडणूक रणनीतीकार म्हणून प्रशांत किशोर यांचा संन्यास

    पश्चिम बंगालमध्ये प्रशांत किशोर यांच्या अचूक व्यवस्थापनामुळे तृणमूल काँग्रेसला 200 हून अधिक जागांवर विजय मिळवला होता. मात्र, निकालाच्या दिवशी प्रशांत किशोर यांनी आपण या निवडणूक व्यवस्थापन क्षेत्रातून संन्यास घेत असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे आता शरद पवार आणि प्रशांत किशोर यांनी भेट नेमकी कशासाठी आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

    Visiting Prashant Kishor Sharad Pawar, who has retired as an election strategist; Because in the bouquet!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Jammu Kashmir : लष्कराचे वाहन ७०० फूट खोल दरीत कोसळले; ३ जवानांचा मृत्यू

    Igla S missile : भारतीय लष्कराला रशियन बनावटीचे इग्ला-एस क्षेपणास्त्र मिळाले

    Manoj Tiwari : मनोज तिवारी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला!