• Download App
    उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा भाजपा राखणार, पंजाबमध्ये कॉँग्रेसचे बारा वाजणार|Uttar Pradesh, Uttarakhand, Goa will be held by BJP, Congress will be defeat in Punjab

    उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा भाजपा राखणार, पंजाबमध्ये कॉँग्रेसचे बारा वाजणार

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि गोवा या तीन राज्यांत भाजपा सत्ता राखणार आहे. मात्र, पंजाबध्ये कॉँग्रेसचे बारा वाजणार असून आम आदमी पक्ष सत्तेच्या जवळ पोहाचणार असल्याचा अंदाज टाइम्स नाऊ नवभारतच्या ताज्या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे.Uttar Pradesh, Uttarakhand, Goa will be held by BJP, Congress will be defeat in Punjab

    पंजाबमध्ये सध्या काँग्रेसची सत्ता असून या राज्यात काँग्रेसला मागे टाकत आप हा पक्ष बहुमताच्या जवळ जाईल असे चित्र या सर्वेक्षणातून समोर आले आहे.उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांनाच पुन्हा कौल मिळेल असा अंदाज बांधला गेला आहे. सर्वेक्षणानुसार ४०३ पैकी २२३ जागा जिंकून भाजप बहुमताचा आकडा सहज पार करेल.



    समाजवादी पक्ष १५२ जागांपर्यंत मुसंडी मारेल अशी शक्यता आहे. बसपाला १३, काँग्रेसला १२ तर अन्य पक्षांच्या खात्यात ३ जागा जातील असे दिसते. मतदानाच्या तारखा जवळ येत असताना समाजवादी पक्षाचे आकडे वेगाने बदलत असल्याने येत्या काळात समीकरणे बदलू शकतात असेही संकेत यातून मिळत आहे.

    उत्तराखंडमध्येही पुन्हा भाजप सरकार स्थापन करेल असे दिसत आहे. ७० पैकी ४२ ते ४६ जागा भाजपला मिळतील असे दाखवण्यात आले आहे. काँग्रेस- १२ ते १४, आप – ८ ते ११, अन्य- २ ते ५ जागा असे चित्र येथे अपेक्षित असल्याचे सर्वेक्षण सांगते.

    पंजाबमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नसले तरी सत्ताधारी काँग्रेसला मागे टाकून आप बहुमताच्या जवळ पोहचेल अशी शक्यता आहे. ११७ पैकी ५८ जागा आपला, ४४ जागा काँग्रेसला, १२ जागा अकाली दलाला, २ जागा भाजपला तर १ जागा अन्यच्या खात्यात जाईल, असा जनमत चाचणीचा अंदाज आहे.

    गोव्यात सध्या भाजपची सत्ता असून ४० सदस्यसंख्या असलेल्या या विधानसभेत २० ते २३ जागा जिंकून भाजप सत्ता कायम राखू शकतं असा अंदाज आहे. काँग्रेसला येथे ४ ते ६ जागा, आपला ६ ते १० जागा तर अन्य पक्षांना ५ ते ६ जागा मिळण्याची शक्यता आहे.

    Uttar Pradesh, Uttarakhand, Goa will be held by BJP, Congress will be defeat in Punjab

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!