• Download App
    उत्तर प्रदेशात समाजवादी बंडखोर नितीन अग्रवाल विधानसभेच्या उपाध्यक्षपदी; भाजपची खेळी | Uttar Pradesh, socialist rebel Nitin Agarwal as the Deputy Speaker of the Legislative Assembly; BJP's game

    उत्तर प्रदेशात समाजवादी बंडखोर नितीन अग्रवाल विधानसभेच्या उपाध्यक्षपदी; भाजपची खेळी

    वृत्तसंस्था

    लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभेची मुदत संपत असताना उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने राजकीय चाल खेळत समाजवादी पक्षाचे बंडखोर उमेदवार नितीन अग्रवाल यांना पाठिंबा देत विधानसभेचे उपाध्यक्ष बनविले आहे. Uttar Pradesh, socialist rebel Nitin Agarwal as the Deputy Speaker of the Legislative Assembly; BJP’s game

    विधानसभेची मुदत आता फक्त चार-पाच महिने उरली आहे. त्याच्याआधी भाजपने समाजवादी पक्षावर मात करण्यासाठी ही चाल खेळल्याचे मानण्यात येते. समाजवादी पक्षाने नरेंद्र वर्मा यांना उमेदवारी जाहीर केली होती. परंतु नितीन अग्रवाल यांनी बंडखोरी केली. भाजपने त्यांना पाठिंबा दिला गुप्त मतदान झालेल्या निवडीत नितीन अग्रवाल यांना 304 मते मिळाली, तर नरेंद्र वर्मा यांना 60 मते मिळाली.



    समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेश विधानसभेत सध्या 50 आमदार आहेत. अर्थात या सर्वांनी नरेंद्र वर्मा यांनाच मतदान केल्याची खात्री नाही. त्यामुळे भाजप सुमारे 150 आमदारांची तिकिटे कापणार आहे, असा दावा करणाऱ्या समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांचा आपलाच पक्ष ठीकठाक राहतो की नाही याची चिंता भाजपने त्यांना करायला लावल्याची चिन्हे दिसली आहेत.

    Uttar Pradesh, socialist rebel Nitin Agarwal as the Deputy Speaker of the Legislative Assembly; BJP’s game

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    NSG ते नेव्ही कमांडोंची शस्त्रास्त्रे भारताला आता सहज आयात करता येणार; जर्मनीने उठवले निर्बंध

    राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीचा निर्णय खरगेंनी घ्यावा, काँग्रेस पक्षाच्या CEC बैठकीत प्रस्ताव

    मोदी सरकारचा कांदा उत्पादकांना मोठा दिलासा, तब्बल 99 हजार 150 मेट्रिक टन कांदा निर्यातीस दिली परवानगी