प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशभरात केंद्रीय तपास संस्था वसुली संचलनालय अर्थात ईडी आणि म इन्कम टॅक्स डिपार्टमेंट यांच्या धडक कारवाया सुरू असताना त्यांच्यावर फक्त विरोधकांवर कारवाया करत असल्याचा आरोप होत आहे. परंतु गेल्या 10 वर्षातील आकडेवारी पाहिली तर ईडी, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आणि अन्य केंद्रीय तपास संस्थांच्या छाप्यांमधून आणि कायदेशीर कारवाई यांमधून सुमारे तब्बल एक लाख कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. मोदी सरकारने ही माहिती लोकसभेत जाहीर केली आहे. Unaccounted assets worth Rs 5,400 crore seized during UPA government and Rs 100,000 crore seized during Modi government
मोदी सरकारच्या 7 वर्षांच्या कारकिर्दीत सुमारे एक लाख कोटी रुपयांची संपत्ती केंद्रीय तपास संस्थांच्या कायदेशीर कारवाई मध्ये जप्त करण्यात आली तर युपीए सरकारच्या कालावधीत 2004 ते 2014 या दहा वर्षांमध्ये केंद्रीय तपास संस्थांच्या कायदेशीर कारवाईत 5400 कोटी रूपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर 2014 ते 2022 या सात वर्षांच्या कालावधीत देशभरात केंद्रीय तपास संस्थांच्या कार्य विशेष कारवाईत विविध ठिकाणचा भ्रष्टाचार उपसून काढत तब्बल 95000 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
लोकसभेत ईडीच्या तसेच केंद्रीय तपास संस्थांनी घातलेल्या छाप्यांबद्दलची ही आकडेवारी इंटरेस्टिंग आहे. 2005 मध्ये पीएमएलए कायदा अस्तित्वात आला. तेव्हापासून आत्तापर्यंत 943 केसेस दाखल आहेत. 23 जण दोषी ठरले आहेत. 2004 ते 14 या दहा वर्षांच्या काळात म्हणजे यूपीए सरकारच्या काळात तपास संस्थांनी 112 ठिकाणी छापे घातले, तर 2014 ते 2022 या आठ वर्षांमध्ये मोदी सरकारच्या काळात केंद्रीय तपास संस्थांनी कायदेशीर कारवाई करत 2974 ठिकाणांवर छापे घालून सुमारे 100000 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त केली आहे.
Unaccounted assets worth Rs 5,400 crore seized during UPA government and Rs 100,000 crore seized during Modi government
महत्त्वाच्या बातम्या
- Shivsena – NCP Fued : आता खुद्द पवारांच्या घरातून शिवसेना पोखरायला आणि श्रीरंग बारणेंना डिवचायला सुरुवात; रोहित पवार म्हणाले, पार्थच्या प्रचाराला जाईन!!
- अनिल देशमुखांचा राजीनामा घेण्यात घाई!!; संजय राऊतांनी पवारांची दाखवली चूक की देशमुखांच्या जखमेवरची काढली खपली??
- टेकडीवर जोडप्याला लूटणारे सराईत गुन्हेगार जेरबंद मराठवाड्यासह विविध जिल्हयात 14 गुन्हे दाखल
- टीएमसी नेत्याच्या हत्येनंतर कोलकाता येथे हिंसाचार; घरांना लावलेल्या आगीत 10 जणांचा मृत्यू