• Download App
    Omicron : गुजरातेत आणखी दोन ओमिक्रॉन बाधितांची भर, आता रुग्णसंख्या ३ वर, रुग्णाच्या संपर्कात आल्याने झाला संसर्ग । Two more Omicron infections in Gujarat, now patients Number Increased To Three, infection due to contact

    Omicron : गुजरातेत आणखी दोन ओमिक्रॉन बाधितांची भर, आता रुग्णसंख्या ३ वर, रुग्णाच्या संपर्कात आल्याने झाला संसर्ग

    गुजरातमध्ये ओमिक्रॉनची आणखी दोन प्रकरणे समोर आली आहेत. जामनगरमधील जुन्या ओमिक्रॉन पॉझिटिव्हच्या संपर्कात आलेल्या दोघांचे अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. गांधीनगरला नमुना पाठवल्यानंतर या लोकांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आता गुजरातमध्ये ओमिक्रॉन बाधितांची संख्या तीन झाली आहे. Two more Omicron infections in Gujarat, now patients Number Increased To Three, infection due to contact


    वृत्तसंस्था

    अहमदाबाद : गुजरातमध्ये ओमिक्रॉनची आणखी दोन प्रकरणे समोर आली आहेत. जामनगरमधील जुन्या ओमिक्रॉन पॉझिटिव्हच्या संपर्कात आलेल्या दोघांचे अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. गांधीनगरला नमुना पाठवल्यानंतर या लोकांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आता गुजरातमध्ये ओमिक्रॉन बाधितांची संख्या तीन झाली आहे.

    शुक्रवारी 72 वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्या व्यक्तीची पत्नी आणि त्याच्या भावाला कोरोनाच्या नवीन प्रकाराचा फटका बसला आहे. जामनगरचे जिल्हाधिकारी सौरभ पारधी यांनी सांगितले की, त्यांची वैद्यकीय स्थिती ठीक आहे आणि गेल्या आठवड्यात या व्यक्तीची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर या लोकांनादेखील विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.



    72 वर्षीय व्यक्ती झिम्बाब्वेहून परतली होती आणि त्यांच्यामध्ये ओमिक्रॉन प्रकार आढळून आला. हे लोक राहत असलेल्या ठिकाणाला कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. देशात आतापर्यंत ओमिक्रॉनचे 23 रुग्ण आढळले आहेत.

    Two more Omicron infections in Gujarat, now patients Number Increased To Three, infection due to contact

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    हेमंत सोरेन यांना पुन्हा धक्का! ED कोर्टाने फेटाळला अंतरिम जामीन

    उज्ज्वल निकमांना उमेदवारी; म्हणे, पूनम महाजनांचा पत्ता कट; पण हा तर खरा त्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!

    ‘ममता बॅनर्जींना अटक करा, अन् ‘TMC’ला दहशतवादी संघटना घोषित करा’