नाशिक : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये खरा “पोलिटिकल सरप्राईज” आला तो तामिळनाडूतून!! एरवी सगळ्या निवडणूक पंडितांनी आणि राजकीय पक्षांनी माध्यमांनी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांवर “कॉन्सन्ट्रेट” केले होते. तिथे ममता बॅनर्जी हरणार की जिंकणार, यावर पैजा लागल्या होत्या. सगळे पोल पंडित आणि राजकीय पक्ष बंगालवर लक्ष ठेवून होते. तिथे अपेक्षेप्रमाणे, म्हणजे माध्यमांनी दाखविलेल्या एक्झिट पोल प्रमाणे ममता बॅनर्जी हरल्याचे दिसले आणि भाजप जिंकल्याचे दिसले. कारण तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी कॉन्सन्ट्रेट केले होते. त्या दोघांनी बंगाल भाजपला जिंकून दाखविला.
– विजयची शिट्टी जोरदार वाजली
पण खरे “सरप्राईज” तर तामिळनाडूमध्ये अभिनेता विजयने दाखवून दिले. अभिनेता विजयच्या तमिळगा वेत्री कळघम या पक्षाची शिट्टी एवढी जोरदार वाजली की त्यामुळे सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम, अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम आणि भाजप या तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या अक्षरशः कानठळ्या बसल्या!!
– माध्यमांची उडाली दांडी
यापैकी कुणालाच तामिळनाडूतला “पॉलिटिकल सरप्राईज” आधी कळला नाही. कुठल्याच निवडणूक पंडिताने अभिनेता विजयची शिट्टी एवढी जोरदार वाजेल असे भाकीत केले नाही किंवा विजयच्या पक्षाला एवढे गांभीर्याने सुद्धा घेतले नाही. कुठल्याच माध्यमांनी विजयाच्या पक्षाची एवढी प्रचंड घोडदौड होईल की तो पहिल्याच प्रयत्नांमध्ये तामिळनाडूच्या सत्तेवर आरूढ होईल, असे दाखविले नव्हते. कुठल्याच माध्यमांच्या एक्झिट पोल मध्ये आजच्या निकालाचे चित्र प्रतिबिंबित झालेच नव्हते. याबाबतीत माध्यमांची पक्की दांडी उडाली.
मग तामिळनाडू सारख्या राज्यात अभिनेता विजय याने पहिल्याच राजकीय प्रयत्नामध्ये एवढी मोठी झेप घेतलीच कशी??, हा सवाल आजच्या निकालाने समोर आणला. तामिळनाडूच्या राजकारणात अभिनेत्यांनी राजकीय भवितव्य आजमावणे हे काही नवीन नव्हते. अगदी करुणानिधी एम. जी. रामचंद्रन यांच्यापासून ते विजय यांच्यापर्यंत अनेकांनी अनेक अभिनेत्यांनी आणि सुपरस्टार्सनी तामिळनाडूच्या राजकारणावर वर्चस्व गाजविले, पण एम. जी रामचंद्रन, जयललिता आणि करुणानिधी हे तीन सुपरस्टार वगळता बाकीच्या अभिनेत्यांना तामिळ राजकारणावर छाप पाडण्यात अपयश आले होते. प्रजनिकांत आणि कमल हसन ही त्याची ठळक उदाहरणे होती. रजनीकांत आणि कमल हसन यांनी आपापले पक्ष काढून पाहिले. निवडणुका सुद्धा लढवून पाहिल्या, पण त्यांना अपेक्षित यश सोडाच, तामिळ राजकारणामध्ये उभे सुद्धा नीट राहता आले नाही. रजनीकांत आणि कमल हसन यांच्या तुलनेत अभिनेता विजय हा काही जास्त मोठा सुपरस्टार नाही, तरीसुद्धा त्याला पहिल्याच राजकीय प्रयत्नांमध्ये तामिळनाडूच्या सत्तेपर्यंत झेप घेता आली, हे फार मोठे राजकीय आश्चर्य तामिळनाडूत घडले. याचा अर्थ तामिळनाडूमध्ये विजयाच्या बाजूने प्रचंड अंतर करंट होता पण तो कुठल्याच माध्यमांना समजला नाही त्यामुळे त्याचे प्रतिबिंब एक्झिट पोलमध्ये उमटले नाही पण ते निकालांमध्ये उमटले.
– सनातन धर्माला शिव्या दिल्याचा फटका
तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री एम. के. स्टालिन आणि त्यांचा मुलगा उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टालिन यांनी सनातन धर्माला शिव्या दिल्या. सनातन धर्म डेंग्यू, मलेरिया आहे. त्याचे उच्चाटन केले पाहिजे, असे ते म्हणाले, पण तामिळी जनतेने या दोघांचेच उच्चाटन करून टाकले. त्यांना तिसऱ्या स्थानावर फेकले, पण म्हणून भाजप किंवा अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम युतीला तामिळ जनतेने स्वीकारले, असे घडले नाही. तामिळी जनतेने तामिळनाडू मधली द्रविड मुन्नेत्र कळघम आणि अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम यांच्यातली राजकीय टेनिस मॅच संपवली. या दोघांना आलटून पालटून सत्ता देण्याचे नाकारले. त्यांच्या ऐवजी अभिनेता विजयच्या तमिळगा वेत्री कळघम या पक्षाला पसंती दिली. त्याला थेट सत्तेच्या दिशेने धाडले.
– मोदी – शाहांचा सुद्धा अंदाज चुकला
याचा अर्थ तमिळनाडूतल्या जनतेला कुठल्याच राष्ट्रीय पक्षांमध्ये बिलकुल इंटरेस्ट नाही त्यांना स्वतःचा स्वतंत्र प्रादेशिक पक्ष हवाय, हेच या निवडणुकीच्या निमित्ताने सिद्ध झाले, पण कुठल्याच राष्ट्रीय पक्षाच्या नेतृत्वाला अगदी भाजपला मोदी आणि शाह यांना देखील त्याचा अंदाज आला नाही. त्यांनी तामिळनाडूची निवडणूक अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघमच्या नेत्यांवर सोडून दिली होती, पण जयललिता यांचे नसणे त्या पक्षाला नडले. तामिळनाडूच्या जनतेने द्रविड म्हणून नेत्र कळघम बरोबर अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघमला सुद्धा नाकारले. या सगळ्या “अंडर करंटचा” अंदाज कुठल्याच राजकीय पंडिताला किंवा निवडणूक पंडिताला नाही. तामिळनाडूच्या जनतेने सगळ्यांना चकविले. यात त्यांनी मोदी आणि शाह यांचा सुद्धा समावेश केला.
TVK ECI Results: How did Vijay’s ‘Whistle’ ring out so loudly in Tamil Nadu?
महत्वाच्या बातम्या
- Israeli : इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; कॅथोलिक कॉन्व्हेंट उद्ध्वस्त, 7 जणांचा मृत्यू.
- नसरापूर अत्याचार प्रकरणाचा तपास स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम कडे; फडणवीस सरकारचा निर्णय
- Iran war : इराण युद्धाला 2 महिने, जगात महागाई वाढली; ₹94.91 लाख कोटी खर्च; ट्रम्प यांची लोकप्रियता घटली
- नसरापूर अत्याचार प्रकरणाला काही लोकांकडून वेगळे वळण; देवेंद्र फडणवीसांनी ठेवले वर्मावर बोट!!
Graveyard : इराणने म्हटले- होर्मुझला अमेरिकी सैन्याची स्मशानभूमी बनवून टाकू; अमेरिकी जहाजांचीही तीच गत होईल