• Download App
    Bengaluru बंगळुरूच्या केम्पेगौडा विमानतळ उडवून

    Bengaluru : बंगळुरूच्या केम्पेगौडा विमानतळ उडवून देण्याची धमकी; दहशतीचे वातावरण

    Bengaluru

    जाणून घ्या, तपासात कोणती बाब समोर आली आहे.


    विशेष प्रतिनिधी

    बंगळुरू: Bengaluru बंगळुरूच्या केम्पेगौडा विमानतळावर बॉम्बच्या धमकीने घबराट निर्माण केली. आठवड्यातून मिळालेली ही दुसरी धमकी आहे. दोन्ही वेळा ही धमकी अफवा असल्याचे सिद्ध झाले. आठवड्यात दुसऱ्यांदा विमानतळावर बनावट बॉम्बच्या धमकीचा ईमेल पाठवण्यात आला आहे.Bengaluru

    विमानतळ सुरक्षा दलाला बॉम्बच्या धमकीचा ईमेल मिळाला. या धमकीच्या मेलमध्ये एका दहशतवाद्याचे नाव देण्यात आले आहे आणि “दहशतवादी अजमल कसाबला फाशी देणे चुकीचे होते” असा दावा करण्यात आला आहे आणि त्याचा बदला घेतला जाईल, अशी धमकी दिली गेली आहे.



    या महिन्याच्या १३ आणि १६ तारखेला बॉम्बच्या धमकीचे २ ईमेल पाठवण्यात आले होते. दोन्ही ईमेलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली होता आणि असे म्हटले होते की जर प्लॅन ए फसला तर प्लॅन बी सक्रिय केला जाईल. एवढंच नाहीतर त्यात असाही दावा करण्यात आला होता की विमानतळाच्या शौचालयाच्या पाइपलाइनमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला आहे.

    धमकी मिळाल्यानंतर, सखोल चौकशी करण्यात आली आणि अधिकाऱ्यांनी ती अफवा घोषित केली. ज्या ईमेल आयडीवरून बनावट बॉम्बची धमकी देण्यात आली होती त्या ईमेल आयडीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे. केम्पेगौडा विमानतळ पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

    Threat to blow up Kempegowda Airport in Bengaluru atmosphere of terror

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची “कमाल”; 613 कोटींच्या भाड्याच्या यांत्रिक झाडूंनी बंगलोरचे रस्ते झाडणार!!

    Mehbooba Mufti : मेहबूबा म्हणाल्या- लाल किल्ल्यासमोर काश्मिरी समस्यांचे पडसाद; सरकारचे जम्मू-काश्मीर सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन, पण दिल्लीच धोक्यात

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार