• Download App
    Zelensky एकीकडे इराण-इस्रायल युद्ध, दुसरीकडे झेलेन्स्कीने घेतला मोठा निर्णय

    एकीकडे इराण-इस्रायल युद्ध, दुसरीकडे झेलेन्स्कीने घेतला मोठा निर्णय

    घटत्या लोकसंख्येच्या संकटाला तोंड देण्यासाठी हा निर्णय़ आहे Zelensky

    विशेष प्रतिनिधी

    कीव – २४ फेब्रुवारी २०२२ रोजी रशियाने युक्रेनवर आक्रमण केले, तेव्हापासून युद्ध सुरू आहे. गेल्या ४० महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धात युक्रेनला मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान सहन करावे लागत आहे. याचा थेट परिणाम त्यांच्या लोकसंख्येवर होत आहे.

    आता या घटत्या लोकसंख्येच्या संकटाला तोंड देण्यासाठी, युक्रेनने बुधवारी एक नवीन कायदा मंजूर केला, ज्यामुळे युक्रेनियन नागरिकांना दुहेरी किंवा बहुनागरिकत्व ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

    दरम्यान, युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की त्यांच्या सैनिकांनी शनिवारी रात्री रशियाने युक्रेनला लक्ष्य केलेले १६७ हवाई हल्ले पाडले. त्यांनी त्यांच्या आकाशाचे रक्षण करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

    झेलेन्स्की म्हणाले की, रशियाने एकूण १८३ ड्रोन आणि विविध प्रकारच्या ११ क्षेपणास्त्रांचा वापर केला, ज्यात “किन्झाल”, बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रांचा समावेश आहे.

    Zelensky takes big decision to address Ukraines declining population crisis

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    China Turns : चीनमध्ये लोकसंख्या वाढवण्यासाठी आयव्हीएफचा आधार; वंध्यत्वाचे प्रमाण 18 टक्के

    Jordan : यूएई, सौदी, जॉर्डनमधील अमेरिकन THAAD संरक्षण प्रणालींवर इराणी हल्ला; जॉर्डनमधील प्रणाली नष्ट, किंमत 22 हजार कोटी

    New Epstein Files : एपस्टीन फाइल- ट्रम्पवर अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचा आरोप; नवीन दस्तऐवजात खुलासा, आधी अधिकाऱ्यांनी डुप्लिकेट सांगून थांबवले होते