Friday, 9 May 2025
  • Download App
    'ममता बॅनर्जींच्या सांगण्यावरून झाला 'हा' घोटाळा'; ज्योतिप्रिय मलिकांच्या अटकेवरून शुभेंदू अधिकारींचं विधान! This scam happened at the behest of Mamata Banerjee Statement of Shubhendu Aadhikari on the arrest of Jyotipriya Malik

    ‘ममता बॅनर्जींच्या सांगण्यावरून झाला ‘हा’ घोटाळा’; ज्योतिप्रिय मलिकांच्या अटकेवरून शुभेंदू अधिकारींचं विधान!

    ईडीने यापूर्वी गुरुवारी  ज्योतिप्रिय मलिक यांच्या घरावर आणि इतर ७ ठिकाणी छापे टाकले होते.

    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता : रेशन वितरण घोटाळ्यावरून पश्चिम बंगालचे राजकारण चांगलेच तापले आहे. शुक्रवारी (२७ ऑक्टोबर) अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या प्रकरणी मोठी कारवाई करत बंगालचे वनमंत्री ज्योतिप्रिय मलिक यांना अटक केली. यावरून भाजपने ममता सरकारवर हल्लाबोल केला आहे. This scam happened at the behest of Mamata Banerjee Statement of Shubhendu Aadhikari on the arrest of Jyotipriya Malik

    पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी मोठा हल्ला चढवला आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सांगण्यावरून हा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला. हा मोठा घोटाळा असल्याचे ते म्हणाले.तसेच, येथील सार्वजनिक वितरण प्रणाली आणि धान खरेदीमध्ये अनियमितता आढळून आली आहे. यात राईस मिल मालकच नाही तर नोकरशहाही सामील असून मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून हा प्रकार घडला आहे. असेही ते म्हणाले आहेत.

    ममता सरकारवर निशाणा साधत शुभेंदू अधिकारी म्हणाले की, राईस मिल मालकांनी बनावट खाती उघडली आहेत आणि केंद्राकडून पैसे घेत आहेत.

    काय आहे रेशन वितरण घोटाळा? –

    2011 ते 2021 दरम्यान, पश्चिम बंगालमधील सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) मध्ये अनेक अनियमितता झाल्याची तक्रार करण्यात आली होती. ज्योतिप्रिय मलिक तेव्हा राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री होते. हे प्रकरण करोना महामारी आणि लॉकडाउन दरम्यान अन्नधान्य वितरणाशी संबंधित आहे.

    या प्रकरणात, ईडीने यापूर्वी गुरुवारी (२६ ऑक्टोबर) ज्योतिप्रिय मलिक यांच्या घरावर आणि इतर ७ ठिकाणी छापे टाकले होते. 18 ते 20 तास चाललेल्या छाप्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी पहाटे त्यांना या कथित घोटाळ्याप्रकरणी अटक केली.

    This scam happened at the behest of Mamata Banerjee Statement of Shubhendu Aadhikari on the arrest of Jyotipriya Malik

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    राष्ट्रीय संकटाच्या या काळात, संपूर्ण देश सरकार अन् सशस्त्र दलांसोबत उभा – आरएसएस

    Operation sindoor : भारतीय सैन्य दले आणि भारतीय नेतृत्वाचे संघाकडून अभिनंदन आणि देशवासीयांना आवाहन!!

    भारतीय सैन्याच्या विजयाची पुरोगामी इस्लामिस्टांना धास्ती; म्हणून पाकिस्तानच्या बचावासाठी करताहेत “बौद्धिक कसरती”!!