देशातील जनतेने २०१९ मध्ये पूर्ण बहुमत दिल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने सीएए म्हणजे नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 लागू केला. यावर टीका होत आहे.मात्र, नुकत्याच प्रसिध्द झालेल्या एका अहवालाने सीएएला विरोध करणाऱ्याच्या डोळ्यात अंजन घातले आहे. पाकिस्तानच नव्हे तर बांग्ला देशातही हिंदूंसाठी दररोजचे जगणे म्हणजे लढाई आहे. २५ वर्षांत एकही हिंदू येथे शिल्लक राहणार नाही, असे या अहवालात म्हटले आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील जनतेने २०१९ मध्ये पूर्ण बहुमत दिल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने सीएए म्हणजे नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 लागू केला. यावर टीका होत आहे.मात्र, नुकत्याच प्रसिध्द झालेल्या एका अहवालाने सीएएला विरोध करणाऱ्याच्या डोळ्यात अंजन घातले आहे. पाकिस्तानच नव्हे तर बांग्ला देशातही हिंदूंसाठी दररोजचे जगणे म्हणजे लढाई आहे. २५ वर्षांत एकही हिंदू येथे शिल्लक राहणार नाही, असे या अहवालात म्हटले आहे.
सेंटर फॉर डेमॉक्रसी प्लूरलिज्म अँड ह्यूमन राइट्सने (सीडीपीएचआर) पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, मलेशिया, इंडोनेशिया, श्रीलंका व तिबेटमधील मानवी हक्कांबाबत हा अहवाल तयार केला आहे. तो शिक्षणतज्ज्ञ, वकील, न्यायाधीश, माध्यमकर्मी व संशोधकांच्या एका समूहाने हा तयार केला आहे.
पाकिस्तानमध्ये आता हिंदू-शीख लोकसंख्या केवळ अडीच टक्के उरली आहे. पाकिस्तानात हिंदू, शीख व ख्रिश्चन अल्पसंख्याकांचे आयुष्य खडतर आहे. हिंदू, शीख व ख्रिश्चन तरुणींचे अपहरण, बलात्कार, बळजबरीने धर्मांतर केले जाते. पाकिस्तानची लोकसंख्या २१ कोटी आहे. फाळणीच्या वेळेस धार्मिक लोकसंख्या आधारभूत मानली तर तेथे हिंदू-शिखांची लोकसंख्या ३.५ कोटी असायला पाहिजे होती. मात्र ती केवळ ५०-६० लाख इतकीच आहे. बहुतांश हिंदू-शिखांनी छळाला कंटाळून इस्लाममध्ये धर्मांतर वा पलायन केले. ज्यांनी विरोध केला, त्यांच्या हत्या करण्यात आल्या.
अफगाणिस्तानातही हिंदू नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचे मानवी हक्क हिरवून घेतले आहेत. देशात १९७० मध्ये ७ लाख हिंदू-शीख होते. आता २०० हिंदू परिवार उरले आहेत. बांगलादेशात ५० वर्षांपासून हिंदूंवर अत्याचार होत आहेत.पाक लष्कराने १९७१ मध्ये लाखो बंगाली हिंदूंची हत्या, बलात्कार व त्यांना हाकलून लावले. ढाका विद्यापीठात रात्रीतून ५ ते १० हजार लोकांची हत्या झाली होती. बांगला देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही तेथील हिंदूवरील अत्याचारांची मालिका थांबलेली नाही. त्यानुसार, ढाका विद्यापीठाचे प्रोफेसर अब्दुल बरकत यांच्या अहवालात दावा केला आहे की, गेल्या ४ दशकांत बांगलादेशातून २.३० लाख लोक दरवर्षी पलायन करत आहेत.
पाकिस्तान,अफगणिस्थान आणि बांग्ला देश या तीनही देशांत हिंदूंवर अत्याचार वाढले आहेत. धार्मिक छळामुळे ज्या अल्पसंख्याकांना या देशातून पळ काढावा लागला आहे, त्यांना या कायद्यामुळे भारतात नागरिकत्व मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- लाजिरवाणे : राज्यात भयंकर नक्षली हल्ला होऊनही मुख्यमंत्री बघेल निवडणुकीच्या प्रचारातच मश्गुल
- ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट टीमने रचला इतिहास, सलग 22 वनडे जिंकून मोडला पुरुष संघाचा विक्रम
- महाराष्ट्रातील कोरोनाच्या उद्रेकामुळे MP सावध, CM शिवराजसिंह चौहान यांचे राज्याच्या सीमा सील करण्याचे आदेश
- यूपीतल्या गुंडांना जसे गुडघे टेकायला लावले, तसे टीएमसीच्या गुंडांनांही गुडघे टेकायला लावू; योगी आदित्यनाथांचा बंगालमध्ये इशारा
- निवडणूक आयोगाने ममतांच्या आरोपांना दिले उत्तर, नंदीग्राममध्ये मतदान प्रक्रियेवरून केलेली तक्रार चुकीची