विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय रेल्वे आणि पर्यटन विभागाने पर्यटकांसाठी नववर्षाची भेट सादर केली आहे. रेल्वेच्या पॅकेजमध्ये विमानातून फिरण्याची संधी मिळणार आहे. केवळ २१ हजार रुपयांमध्ये दार्जीलिंग, कॅलिम्पोंग आणि गंगटोकची सफर करता येणार आहे.The opportunity to travel by plane in the railway package, travel to Darjeeling, Kalimpong and Gangtok for only Rs 21,000.
ट्रिपल ऑक्युपन्सीसाठी म्हणजे तीन जणांच्या खोलीसाठी २१ हजार आणि डबल ऑक्युपन्सी म्हणजे दोन जणांच्या खोलीसाठी २७ हजार रुपये भरावे लागणार आहे. हे पॅकेज एकूण ६ रात्र आणि ७ दिवसांचं असणार आहे. याअंतर्गत कलिम्पोंग, गंगटोक आणि दार्जिलिंगची सफर करता येणार आहे.
कलिम्पोंग, गंगटोक आणि दार्जिलिंग टूर पॅकेज ३० जानेवारी रोजी आहे. इंडिगो विमानातून मुुंबईहून सकाळी पावणेआठ वाजता सहल सुरू होईल. ५ फेबु्रवारी रोजी मुंबई विमानतळावर परत येईल. बागडोगरापर्यंत विमानाने प्रवास होणार आहे. आयआरसीटीसीनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर देखील या पॅकेजची सविस्तर माहिती दिली आहे.
यासाठीचा फोन नंबर आणि इतर संपूर्ण माहिती यात देण्यात आली आहे. १ रात्र कलिम्पोंग, ३ रात्र गंगटोक आणि २ रात्र दार्जिलिंगमध्ये राहण्याची व्यवस्था केली गेली आहे. पॅकेजमध्ये आगमनानंतर वेलकम ड्रिंक्स, डिलक्स हॉटेलमध्ये ट्विन शेअरिंग तत्त्वावर राहण्याची व्यवस्था आणि रोजचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण यांचाही समावेश आहे.
The opportunity to travel by plane in the railway package, travel to Darjeeling, Kalimpong and Gangtok for only Rs 21,000.
महत्त्वाच्या बातम्या
- PADMA AWARDS 2021 : बीजमाता राहीबाईंचा दिल्लीत गौरव ! नथीचा नखरा…नव्हे…नव्हे ‘गावरान’ ठसका! कोण आहेत राहीबाई पोपेरे ?
- तेलंगणाचे मुख्यमंत्री बिथरले, भाजप नेत्यांना जीभ कापून टाकण्याची दिली धमकी
- मोदी ज्याप्रकारे देश चालवित आहेत तशी तुम्हाला मुंबई महापालिकाही चालविता येत नाही, नारायण राणे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- लिओनार्डो डिकॅप्रियोला पाहताच जेफ बेझोसची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझच्या फॅन गर्ल मोमेंटचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल