विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदान पार पाडण्यासाठी ‘एकमेव सुरक्षित मार्ग’ म्हणजे निवडणूक आयोगाने या पाच राज्यांमध्ये किमान 80% लोकांसाठी लसींच्या दोन्ही डोसचा आग्रह धरला पाहिजे, असा सल्ला रणनितीकार प्रशांत किशोर यांनी दिला आहे.The only safe way to hold elections in five states is 80 per cent vaccination, Prashant Kishor advised the Election Commission
प्रशांत किशोर यांनी ट्विट करून म्हटले आहे की, या भयंकर महामारीच्या काळात निवडणूक घेण्याचा हाच एकमेव सुरक्षित मार्ग आहे. कोरोना सुयोग्य वर्तनासाठी मार्गदर्शक तत्त्वे असूनही जर त्याचं अनुसरण केलं जाणार नसेल तर ती गोष्ट हास्यास्पद आहे.
उत्तर प्रदेशात येत्या मार्चमध्ये निवडणुका होणार आहेत. यासाठी निवडणूक आयोगाने पाहणीही केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, निवडणूक आयोगाने निवडणुका ठरल्या वेळी होणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, काही पक्षांना आता निवडणुका होणे नको आहे. या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांचे ट्विट आले आहे.
The only safe way to hold elections in five states is 80 per cent vaccination, Prashant Kishor advised the Election Commission
महत्त्वाच्या बातम्या
- RECORD VACCINATION : भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ! एक वर्ष-150 कोटी लसीकरण!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं अभिनंदन…
- JAWED HABIB CASE : जावेद हबीबचा किळसवाणा प्रकार – राष्ट्रीय महिला आयोगाची नोटीस -11 जानेवारीला हजर राहण्याचे आदेश
- WATCH : कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी चिंता नको ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची प्रतिक्रिया
- साऊथ सुपरस्टार महेशबाबूला कोरोनाची लागण