• Download App
    मुंबई उच्च न्यायालयासमोर मोठा पेच, नियुक्तीसाठी पाठविलेल्या १८ न्यायाधिशांची नावे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजिअमने पाठविली परत|The names of 18 judges sent by Mumbai high court for appointment were sent back by the Supreme Court Collegium.

    मुंबई उच्च न्यायालयासमोर मोठा पेच, नियुक्तीसाठी पाठविलेल्या १८ न्यायाधिशांची नावे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजिअमने पाठविली परत

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : मुंबई उच्च न्यायालयाने न्यायाधिशपदाच्या नियुक्तीसाठी पाठविलेली १८ नावे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजिअमने परत पाठविली होती. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.The names of 18 judges sent by Mumbai high court for appointment were sent back by the Supreme Court Collegium.

    सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधिश शरद बोबडे यांच्यासाठीही हे लाजीरवाणे असून त्यांनी आपल्या निवृत्तीआधी एक महिना अगोदर या न्यायाधिशांच्या नियुक्तीसाठी आग्रह धरला होता.



    मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश बी. पी. धर्माधिकारी यांच्या अल्प कालावधीत उच्च न्यायालयाने या २२ जणांची न्यायाधिशपदी नियुक्तीसाठी नावे पाठविली होती. यापैकी १८ वकील आणि चार न्यायिक अधिकारी होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजिअमने या नावांवर पुनर्विचार करण्यास सांगितले आहे.

    माजी सरन्यायाधिश शरद बोबडे यांचा हा अपमान मानला जात आहे. त्यांनी सेवानिवृत्तीच्या एक महिना अगोदरच या नियुक्ती करण्याचा प्रयत्न केला होता.
    केंद्र सरकारनेही या न्यायाधिशांची नावे परत पाठविण्यास आक्षेप घेतला होता.

    १२ ऑगस्ट रोजी केंद्राकडून ही नावे पुन्हा कॉलेजिअमकडे पाठविण्यात आली होती. मात्र, कॉलेजिअमने १७ ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाकडे ही नावे परत पाठविली.

    सेवानिवृत्तीच्या वेळी माजी सरन्यायाधीश बोबडे यांना मुंबई उच्च न्यायालयातील रिक्त पदे भरण्याची गरज वाटली. त्यासाठी त्यांनी कॉलेजियमसोबत बैठक आयोजित केली. बैठकीत 22 पैकी 13 नावे नियुक्तीसाठी योग्य असल्याचे म्हटले होते.

    The names of 18 judges sent by Mumbai high court for appointment were sent back by the Supreme Court Collegium.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Indian Passport : 1 जुलैपासून पासपोर्ट काढणे महाग होईल; सामान्य श्रेणीतील पासपोर्ट ₹2,500 आणि तत्काळ ₹5,000 मध्ये मिळेल, हरवल्यास किंवा खराब झाल्यास ₹8,500 पर्यंत शुल्क

    राम मंदिरात चोरी झाली, बरे झाले; विरोधकांचे सनातन धर्मावरचे प्रेम उफाळून वर आले!!

    राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी टिन्नू यादवसह 8 आरोपींना रात्री उशिरा अटक; आज कोर्टात करणार हजर!!