• Download App
    विधानसभेत वापरलेल्या ईव्हीएमचा ताबा मिळविण्यासाठी निवडणूक आयोगाची सर्वोच्च न्यायालयात धाव|The Election Commission rushed to the Supreme Court to get possession of the EVM used in the Assembly

    विधानसभेत वापरलेल्या ईव्हीएमचा ताबा मिळविण्यासाठी निवडणूक आयोगाची सर्वोच्च न्यायालयात धाव

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: आसाम, केरळ, दिल्ली, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या सहा राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी वापरण्यात आलेल्या ईव्हीएमचा ताबा मिळविण्यासाठी निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह अन्य राज्यांत होणाºया निवडणुकांसाठी या मशीनची गरज असल्याचे म्हणत त्वरित सुनावणी घेण्याची मागणी निवडणूक आयोगाने केली आहे.The Election Commission rushed to the Supreme Court to get possession of the EVM used in the Assembly

    निवडणूक झाल्यावर मतदान प्रक्रियेवर आक्षेप घेण्यासाठी काही विशिष्ठ वेळ दिली जाते. या सहा राज्यांच्या निवडणुका मे महिन्यात झाल्या. परंतु, कोरोना महामारीमुळे आक्षेप घेण्याची मुदत वाढविली आहे. त्यामुळे आसाम, केरळ, दिल्ली, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या सहा राज्यांच्या विधानसभा निवडणुकांशी संबंधित निवडणूक याचिका दाखल करण्यासाठी कालमयार्दा निश्चित करण्याची मागणीही आयोगाने केली आहे.



    निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे की या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या सहा राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये वापरल्या जाणाºया इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांना (ईव्हीएम) निवडणूक आयोगाच्या ताब्यात देण्यात यावे.

    कोरोना लाटेमुळे मतदानाशी संबंधित याचिका दाखल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मुदत वाढवल्यामुळे मतदान यंत्रे पडून आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि इतर राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएमची गरज भासणार आहे.

    सरन्यायाधीश एन व्ही रमण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने पुढील आठवड्यात याचिकेवर सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली आहे. वरिष्ठ वकील विकास सिंह यांनी सादर केलेल्या निवडणूक आयोगाच्या याचिकेत मतदार-सत्यापित पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपीएटी) मशीनही परत देण्याची मागणी केली आहे.

    ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मशीनची देखभाल करायची आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाबसारख्या राज्यांमध्ये निवडणुका लवकरच असल्याने सुनावणी आवश्यक आहे. आगामी निवडणुकांसाठी या मशीनची आवश्यकता असेल, असे सिंह म्हणाले.

    The Election Commission rushed to the Supreme Court to get possession of the EVM used in the Assembly

     

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही