वृत्तसंस्था
नवी दिल्ली – सन २०१८ नंतर सातत्याने वाढवत नेलेली सीमेवरची शस्त्रसंधीची मोडतोड पाकिस्तानने २०२१ मध्ये लक्षणीयरित्या कमी केली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या तुलनात्मक आकडेवारीतून ही बाब स्पष्ट झाली आहे.The details of number of incidents of Ceasefire Violation/Cross Border Firing in Jammu and Kashmir by Pakistan during the last three years, month-wise is as under: Ministry of Home Affairs (MHA) in Lok Sabha
भारताबरोबर सीमेवर शस्त्रसंधी करण्याची तयारी पाकिस्तान दाखवितो. शस्त्रसंधीही करतो पण दहशतवाद्यांना घुसविण्याच्या निमित्ताने पुन्हा पुन्हा शस्त्रसंधी मोडून सीमेपलिकडून भारतीय हद्दीत गोळीबार करत राहतो. ही पाकिस्तानची खुमखुमी जुनी आहे.
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडून गोळीबार केल्याच्या घटनांची आकडेवारी पाकिस्तानची खुमखुमी किती तीव्र आहे, ते सांगते. २०१८ मध्ये पाकिस्तानने २१४० वेळा शस्त्रसंधी तोडून गोळीबार केला. २०१९ मध्ये ३४७९ वेळा तर २०२० मध्ये चरमसीमा गाठून पाकिस्तानने शस्त्रसंधी तोडून ५१३३ वेळा गोळीबार केला. २०२१ मध्ये जून महिन्यापर्यंतच्या आकडेवारीनुसार ६६४ वेळा पाकिस्तानने शस्त्रसंधी तोडून भारतीय सीमेवर गोळीबार केला आहे.
गेल्या ३ वर्षांच्या वाढत्या आकडेवारीच्या तुलनेत २०२१ ची आकडेवारी कमी आहे. भारताने कठोरातले कठोर उपाय योजले आहेत. शिवाय गेल्या दोन महिन्यांपासून पाकिस्तानने ड्रोन दहशतवादाचा नवा फॉर्म्युला शोधून काढला आहे. शस्त्रसंधी तोडून भारतावर गोळीबार केला की भारत आपल्या दुप्पट गोळीबार करून पाकिस्तानच्या लक्षात आल्यानंतर पाकिस्तानने आपली चाल बदलली आहे. त्यांनी ड्रोनद्वारे हेरगिरी, शस्त्रपुरवठा, ड्रग्ज पुरवठा चालू केला आहे.
जम्मू आणि काश्मीरच्या सीमेवर पाकिस्तानच्या बाजूने अनेक ड्रोन आतापर्यंत डिटेक्ट झाली आहेत. पाकिस्तानने २०२१ मध्ये शस्त्रसंधी तोडून गोळीबार करण्याच्या घटनांमध्ये घट केल्यामागचे त्याचे हे ड्रोन दहशतवाद चालू केल्याचे रहस्य देखील आता उघड झाले आहे.
The details of number of incidents of Ceasefire Violation/Cross Border Firing in Jammu and Kashmir by Pakistan during the last three years, month-wise is as under: Ministry of Home Affairs (MHA) in Lok Sabha
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधान कार्यालयातील सल्लागार अमरजित सिन्हा यांचा राजीनामा
- कास्टिंग काऊचविरोधात आवाज उठविणाऱ्या तरुणींचे राज ठाकरेंकडून अभिनंदन, गुन्हेगारांना तातडीने अटक करण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी
- गुन्हेगारी स्वरुपाचे आरोप तरीही सरकारी बंगल्यात, अनिल देशमुख, संजय राठोड यांनी अद्याप शासकीय निवासस्थाने सोडली नाहीत
- अकाली दलाच्या हटवादीपणाला नेते कंटाळले, कृषि विधेयकावरील भूमिकेवरून नाराज पाच नेत्यांनी भाजपामध्ये केला प्रवेश