• Download App
    जाता जात नाही ती जात : गुगलवर खेळाडूंची जात शोधताहेत लोक, साक्षी मलिक - पीव्ही सिंधूची जात शोधण्यात राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र- तेलंगण, बिहारचे लोक जास्त । google users searching olympic medalist Pv sindhu caste

    जाता जात नाही ती जात : गुगलवर खेळाडूंची जात शोधताहेत लोक, साक्षी मलिक – पीव्ही सिंधूची जात शोधण्यात राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र- तेलंगण, बिहारचे लोक जास्त

    Pv sindhu caste : टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावणाऱ्या पुसरला वेंकट सिंधू अर्थात पीव्ही सिंधूची जात गुगलवर सर्च केली जात आहे. ट्विटर युजर्सनी गुगल जात शोधणाऱ्यांना खडसावले आहे. Google वर कोणते शब्द शोधले जात आहेत याची माहिती trend.google.com वर उपलब्ध आहे. 1 ऑगस्ट रोजी सिंधूने पदक जिंकले म्हणून pv sindhu caste त्या दिवसाचा सर्वाधिक शोधलेला कीवर्ड बनला. google users searching olympic medalist Pv sindhu caste


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावणाऱ्या पुसरला वेंकट सिंधू अर्थात पीव्ही सिंधूची जात गुगलवर सर्च केली जात आहे. ट्विटर युजर्सनी गुगल जात शोधणाऱ्यांना खडसावले आहे. Google वर कोणते शब्द शोधले जात आहेत याची माहिती trend.google.com वर उपलब्ध आहे. 1 ऑगस्ट रोजी सिंधूने पदक जिंकले म्हणून pv sindhu caste त्या दिवसाचा सर्वाधिक शोधलेला कीवर्ड बनला.

    सोशल मीडिया वापरकर्त्यांचा असा आरोप आहे की, जेव्हा सिंधूने पदक जिंकले, तेव्हा तिच्या खेळाबद्दल, तिच्या आयुष्याबद्दल, जिला तिने पराभूत केले, यासारख्या गोष्टींपेक्षा जास्त तिची जातच जास्त शोधण्यात आली. आंध्र प्रदेश, तेलंगण, महाराष्ट्र, बिहार आणि गुजरातमध्ये सिंधूची जात शोधणाऱ्या लोकांची संख्या सर्वाधिक आहे.

    ऑगस्ट 2016 पासून सिंधूची जात गुगलवर सर्च केली जात आहे
    गुगल ट्रेंड्सच्या आलेखात असे दिसून येते की pv sindhu caste हा कीवर्ड ऑगस्ट 2016 मध्ये प्रथम गुगलवर शोधण्यात आला. वास्तविक, 20 ऑगस्ट 2016 रोजी सिंधूने रिओ उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले. त्यानंतर सलग पाच वर्षे काही जणांनी सिंधूच्या जातीचा शोध घेतला, परंतु 1 ऑगस्ट रोजी त्यात 90% वाढ झाली.

    लोकांना जाणून घ्यायचीय सिंधूची जात

    गुगलच्या आकडेवारीनुसार सिंधूची जात शोधण्यासाठी लोकांनी खूप वेळा नाना तऱ्हेचे प्रयत्न केले आहेत. त्यांनी केवळ pv sindhu caste चाच शोध घेतला नाही, तर pusarala caste, pusarala surname caste हेसुद्धा सर्च केले आहे.

    जात शोधणारे सर्व सुशिक्षित

    तथापि, गुगलवर ज्यांनी कुणी जात शोधण्याचा पराक्रम केला आहे ते सर्व गरीब किंवा ग्रामीण लोक नाहीत. जे असे करत आहेत त्यांना इंग्रजी येते, मोबाईल, लॅपटॉप किंवा असे कोणतेही उपकरण आणि इंटरनेट डेटा टाइप करण्याचे ज्ञान आहे. जाता जात नाही ती जात असे म्हणतात. भारतीय समाजव्यवस्थेला एकसंध होण्यापासून रोखणाऱ्या जातीपातीच्या भिंती ना शिक्षणाने ध्वस्त झाल्या, ना आधुनिक शहरीकरणाने.

    असे असले तरी एखाद्या खेळाडूची गुगलवर जात शोधण्याची ही काही पहिलीच घटना नाही. लोक पूर्वीही असे करत आले आहेत.

    राजस्थान, यूपी आणि दिल्लीच्या लोकांनी साक्षी मलिकची जात सर्वात जास्त शोधली होती

    कुस्तीपटू साक्षी मलिकने 2016 च्या रिओ उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले. तेव्हापासून तिची जात सातत्याने गुगलवर सर्च केली जात आहे. हे चक्र अजून थांबलेले नाही. गुगलच्या आकडेवारीनुसार, जानेवारी-फेब्रुवारी 2021 मध्ये sakshi malik caste, malik caste यासारखे कीवर्डही टॉप ट्रेंडमध्ये आले होते. मलिकची जात राजस्थान, दिल्ली आणि उत्तर प्रदेशातून गुगलवर सर्वाधिक सर्च केली गेली.

    याच मालिकेत पुलेला गोपीचंद, भारताची तीरंदाज दीपिका कुमारी, क्रिकेटपटू संजू सॅमसन यांचीही जात गुगलवर शोधण्यात लोकांनी शक्ती खर्च केलेली आहे.

    google users searching olympic medalist Pv sindhu caste

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    हेमंत सोरेन यांना पुन्हा धक्का! ED कोर्टाने फेटाळला अंतरिम जामीन

    उज्ज्वल निकमांना उमेदवारी; म्हणे, पूनम महाजनांचा पत्ता कट; पण हा तर खरा त्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!

    ‘ममता बॅनर्जींना अटक करा, अन् ‘TMC’ला दहशतवादी संघटना घोषित करा’