विशेष प्रतिनिधी
जम्मू : दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथील लिटर भागात रविवारी दहशतवाद्यांनी दोन गैर-काश्मीरींना गोळ्या घातल्या. दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना योग्य उपचारासाठी श्रीनगरला रेफर करण्यात आले आहे. सूत्रांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी पठाणकोटचे रहिवासी असलेल्या दोन जणांना संध्याकाळी लिटर परिसरात पोहोचल्यावर गोळ्या झाडल्या. Terrorists fire on two in Pulwama
त्यापैकी एक चालक आणि दुसरा त्याचा साथीदार आहे. दोघेही पोल्ट्री वाहनात होते, असे सांगण्यात येत आहे. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी.एस. तुल्ला यांनी सांगितले की, जखमींपैकी एक सुरेंद्रच्या छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली आहे.
त्यांना चांगल्या उपचारासाठी श्रीनगरच्या एसएमएचएस रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दुसऱ्याचे नाव धीरज दत्ता असे आहे. त्याच्या पायाला गोळी लागली आहे. त्याच्या पायावर अधिक उपचार सुरू आहेत.
Terrorists fire on two in Pulwama
महत्त्वाच्या बातम्या
- राजस्थानमधील करौली येथे जातीय दंगल हिंदू नववर्षानिमित्त काढण्यात आलेल्या बाईक रॅलीवर दगडफेक
- दिल्लीत पुन्हा एकदा दारूच्या किमती कमी होणार
- एलजीबीटी समुदायाला विवाहाचे समान अधिकार द्यावेत सुप्रिया सुळेंचे खाजगी विधेयक लोकसभेत सादर
- Russia India Talk : रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या भेटीत पीएम मोदींकडून तत्काळ युद्धबंदीचा पुनरुच्चार, रशियन मंत्री म्हणाले- भारत करू शकतो मध्यस्थता!
- नाशिक मध्ये महा ढोलवादन, महारांगोळी, अंतर्नाद पुन्हा होणार; नववर्ष स्वागत समितीची कार्यक्रमांच्या नव्या तारखा जाहीर!!