• Download App
    काश्मीरमध्ये बांधले जातेय देवी सरस्वतीचे मंदिर : सप्टेंबरपर्यंत तयार होणार, पीओकेमधील शारदा पीठापर्यंत कॉरिडॉर बांधण्याचीही मागणी|Temple of Goddess Saraswati to be built in Kashmir to be completed by September

    काश्मीरमध्ये बांधले जातेय देवी सरस्वतीचे मंदिर ; सप्टेंबरपर्यंत तयार होणार, पीओकेमधील शारदा पीठापर्यंत कॉरिडॉर बांधण्याचीही मागणी

    पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) शारदा पीठ मंदिरात जाण्यास असमर्थ असलेल्या हिंदूंसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता उत्तर काश्मीरमधील टिटवाल भागात एलओसीजवळ माता शारदाचे मंदिर बांधले जात आहे. या वर्षी सप्टेंबरपर्यंत ते पूर्ण होणार असून यानंतर भाविकांना मंदिरात दर्शन आणि प्रार्थना करता येणार आहे.Temple of Goddess Saraswati to be built in Kashmir to be completed by September


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) शारदा पीठ मंदिरात जाण्यास असमर्थ असलेल्या हिंदूंसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता उत्तर काश्मीरमधील टिटवाल भागात एलओसीजवळ माता शारदाचे मंदिर बांधले जात आहे. या वर्षी सप्टेंबरपर्यंत ते पूर्ण होणार असून यानंतर भाविकांना मंदिरात दर्शन आणि प्रार्थना करता येणार आहे.

    हिंदू, मुस्लिम आणि शिखांनी एकत्र केली पूजा

    हे मंदिर सेवा शारदा समिती काश्मीर (SSCK) द्वारे बांधले जात आहे. एसएससीकेचे प्रमुख रविंदर पंडिता यांनी माहिती दिली की, बांधकाम साइटवर पूजेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये देशाच्या विविध भागांतील काश्मिरी हिंदूंनी हजेरी लावली होती. यावेळी शीख आणि मुस्लिमांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला.



    सहा महिन्यांत मंदिर बांधले जाईल

    पंडित यांनी सांगितले की, मातेच्या मंदिराचे बांधकाम सध्या जोरात सुरू आहे. सहा महिन्यांत बांधकाम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. PoK मधील शारदा पीठ मंदिराच्या जुन्या तीर्थक्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्यासाठी हे मंदिर बांधले जात आहे. मंदिर बांधण्याच्या आराखड्याला आणि मॉडेलला कर्नाटकातील शृंगेरी दक्षिण मठाने मान्यता दिली आहे. मंदिरात वापरण्यात येणारे ग्रॅनाइटचे दगड कर्नाटकातील बिदाडी येथून आणण्यात येणार आहेत.

    1947 मध्ये नष्ट झाले होते मंदिर

    शारदा पीठाचा अर्थ शारदेचे स्थान किंवा आसन आहे. हे देवी सरस्वतीचे काश्मिरी नाव आहे. शारदा पीठ हे पीओकेमधील नीलम नदीच्या काठी शारदा गावात वसलेले मंदिर आहे. शारदा पीठ हे 18 महाशक्ती पीठांपैकी एक आहे. हिंदू मान्यतेनुसार येथे देवी सतीचा उजवा हात पडला होता. हे प्राचीन वारसा स्थळ 1947 मध्ये नष्ट झाले.

    महाराजा गुलाबसिंग यांनी केला होता जीर्णोद्धार

    शारदा पीठात देवी सरस्वतीची पूजा केली जाते. हे भारतीय उपखंडातील प्रमुख प्राचीन विद्यापीठांपैकी एक होते. शंकराचार्य सर्वज्ञपीठम येथे बसले होते. या मंदिराची शेवटची डागडुजी १९व्या शतकातील महाराज गुलाब सिंग यांनी केली होती. शारदा देवी मंदिरात स्वातंत्र्यानंतर विधिवत पूजा झालेली नाही.

    प्रवासासाठी ना-हरकत प्रमाणपत्र गरजेचे

    एलओसीच्या अगदी जवळ असल्यामुळे येथे तीर्थयात्रेला सहज परवानगी नाही. भारतीयांना मंदिरात जाण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. कर्तारपूरच्या धर्तीवर शारदा पीठ तीर्थयात्रेसाठी खुले करावे, अशी मागणी लोकांनी केली आहे. नियंत्रण रेषेपासून या पीठाचे अंतर 10 किलोमीटर आहे.

    Temple of Goddess Saraswati to be built in Kashmir to be completed by September

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Vande Metro Train: वंदे मेट्रो ट्रेन लवकरच सुरू होणार, प्रवाशांना मिळणार इंटरसिटीसारख्या सुविधा!

    सलमान खान गोळीबार प्रकरण: अटक केलेल्या सर्व आरोपींवर मुंबई पोलिसांनी लावले ‘MCOCA’ कलम!

    आप आमदार अमानतुल्ला यांना ईडीचे समन्स; 29 एप्रिलला कागदपत्रांसह हजर राहण्यास सांगितले