नाशिक : ECI Results : बंगाल मध्ये ममतांची फरफट करून भाजपची घोडदौड, पण खरा धक्का तर विजयचा तामिळनाडूतून!!, हेच राजकीय वास्तव चित्र आज सकाळपासून दिसायला लागले.
पश्चिम बंगाल मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह त्यांनी प्रचंड जोर लावल्यामुळे ममता बॅनर्जी हरणार आणि भाजप तिथे जिंकणार याची वातावरण निर्मिती आधीच झाली होती. राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था स्थिती ममता बॅनर्जी यांच्या तृणमूळ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आधीच बिघडवून ठेवली होती. त्यामुळे पश्चिम बंगाल हे राज्य सर्वाधिक चर्चेत होते. माध्यमांनी सुद्धा पश्चिम बंगाल वरच कॉन्सन्ट्रेट केले होते. त्या तुलनेमध्ये माध्यमांचे आणि जनतेचे सुद्धा तामिळनाडूकडे दुर्लक्ष झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी ज्या तीव्रतेने पश्चिम बंगाल वर कॉन्सन्ट्रेट केले होते, तेवढे तामिळनाडू वर कॉन्सन्ट्रेट केले नव्हते. त्यांनी तामिळनाडूची निवडणूक भाजपचा मित्र पक्ष अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम याच्यावर सोडून दिली होती.
– तामिळनाडूत विजयचा झेंडा
याचा परिणाम पश्चिम बंगाल बरोबरच तामिळनाडू वर वेगळ्या पद्धतीने झाला. पश्चिम बंगाल मध्ये भाजपने ममता बॅनर्जी यांच्यावर मात करून सत्तेच्या दिशेने घोडदौड सुरू केली, पण तामिळनाडूमध्ये अभिनेता विजय याने चक्रावणारा निकाल आणला. अभिनेता विजय याचा पक्ष तमिळगा वेत्री कळघम याने मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांच्या द्रविड मुन्नेत्र कळघमला फक्त पराभूतच केले असे नाही, तर थेट तिसऱ्या क्रमांकावर ढकलून दिले. तामिळनाडूच्या राजकारणामध्ये मोठे राजकीय स्फोट घडविले. तामिळनाडूमध्ये आत्तापर्यंत द्रविड मुन्नेत्र कळमघ आणि अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या दोन पक्षांचीच राजकीय टेनिस मॅच चालायची. दोन पैकी एक पक्ष सत्तेवर असायचा. तिथे द्विपक्षीय राजकीय व्यवस्था प्रस्थापित झाली होती. पण 2026 च्या विधानसभा निवडणुकीत अभिनेता विजय याने आपल्या पक्षाचा प्रचंड उदय घडवून आणला. त्यामुळे तामिळनाडूमध्ये राजकीय इतिहासात पहिल्यांदाच त्रिशंकू विधानसभेची शक्यता निर्माण झाली.
– तामिळनाडू त्रिशंकू विधानसभा
तामिळनाडूमध्ये निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अभिनेता विजय याच्या तमिळगा वेत्री कळघम या पक्षाला 97, अण्णा द्रमुकला 66, तर द्रमुकला 37 जागांवर आघाडी मिळाली. याचा अर्थ सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम हा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. तामिळनाडूच्या राजकीय इतिहासातली निवडणुकीतली ही फार मोठी क्रांती ठरली.
Tamil Nadu Election Result 2026
महत्वाच्या बातम्या
- Israeli : इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; कॅथोलिक कॉन्व्हेंट उद्ध्वस्त, 7 जणांचा मृत्यू.
- नसरापूर अत्याचार प्रकरणाचा तपास स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम कडे; फडणवीस सरकारचा निर्णय
- Iran war : इराण युद्धाला 2 महिने, जगात महागाई वाढली; ₹94.91 लाख कोटी खर्च; ट्रम्प यांची लोकप्रियता घटली
- नसरापूर अत्याचार प्रकरणाला काही लोकांकडून वेगळे वळण; देवेंद्र फडणवीसांनी ठेवले वर्मावर बोट!!