वृत्तसंस्था
नवी दिल्लीः तालिबानचा प्रमुख सात नेत्यांपैकी एक असलेला हैबतुल्लाह अखुंदजादा हा आता कुठे आहे? भारत सरकार यासंबंधी विदेशी गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीवर अभ्यास करत आहे आणि गटाच्या संभाषणांवर लक्ष ठेवून आहे. तालिबानचा प्रमुख हैबतुल्लाह अखुंदजादा पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असल्याचे सांगितले जात आहे. Taliban chief haibatullah akhundzada may be in pakistan army custody says sources
गेल्या सहा महिन्यांपासून त्याला तालिबानचे प्रमुख नेते आणि इतरांनी बघितलेलं नाही. ईद-उल-फितरच्या निमित्ताने मे महिन्यात त्याचा शेवटचा जाहीर संदेश आला होता. आता पाकिस्तान हे प्रकरण कशा प्रकारे हाताळतो यावर भारत बारकाईने लक्ष ठेवून आहे, असे सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.
तालिबानचा प्रमुख पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात, विदेशी गुप्तचर यंत्रणांनी दिली भारताला माहिती
हैबतुल्लाह अखुंदजादाला मे २०१६ मध्ये तालिबानचा प्रमुख म्हणून नियुक्त केलं गेलं होतं. तालिबानचा आधीचा नेता अख्तर मंसूर हा अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारला गेला. त्यानंतर अखुंदजादाला नियुक्त केले. मंसूरच्या दोन उप्रमुखांपैकी एक असलेल्या हैबतुल्लाहला पाकिस्तानमध्ये झालेल्या बैठकीत तालिबानचा प्रमुख म्हणून निवडलं गेलं. ५० वर्षीय हैबतुल्लाह अखुंदजादा हा कायदेपंडित आहे. इस्लामसाठी अत्यंत टोकाचे नियम लागू करण्याचे श्रेय त्याला दिले जाते. अखुंदजादा हा तालिबानच्या प्रमुख सात नेत्यांपैकी एक आहे. या सात नेत्यांची संघटना अफगाणिस्तावर कब्जा केल्यानंतर देशाला चालवण्यासाठी प्रभावी नेतृत्व असल्याचं बोललं जातंय. लश्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांमधील अनेक जण तालिबानमध्ये सामील झाले आहेत, अशी माहिती दिल्लीत मिळाल्याचं बोललं जात आहे. अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा मिळवला. पण, तालिबानचा प्रमुख म्होरक्या हैबतुल्लाह अखुंदजादा कुठे आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनेक देशांच्या गुप्तचर यंत्रणा त्याच्या मागावर आहेत. हैबतुल्लाह अखुंदजादा हा सध्या पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असल्याचे सांगितले जात आहे.
Taliban chief haibatullah akhundzada may be in pakistan army custody says sources
महत्त्वाच्या बातम्या
- फेररचनेनंतर केवळ कोणत्याही एकाच राज्यात मिळणार आरक्षणाचा लाभ
- छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान हुतात्मा
- बिहारच्या राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यतास पंतप्रधान मोदी यांना नितीश कुमार भेटणार
- ममतादीदींसाठी नेताजींचे नातू पुन्हा उतरणार राजकारणाच्या आखाड्यात, देशद्रोहाच्या कायद्याला विरोध
- अंतराळ स्थानकात सुरु झाली ‘स्पेसवॉक’साठीची लगबग, सात अंतराळवीर सज्ज