वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Supreme Court देशातील न्यायालयांमधील शौचालयांसारख्या मूलभूत सुविधांच्या स्थितीबाबत सर्वोच्च न्यायालयाने कडक भूमिका घेतली आहे. बुधवारी, देशातील २५ पैकी २० उच्च न्यायालयांनी शौचालय सुविधा सुधारण्यासाठी कोणती पावले उचलली आहेत हे अद्याप सांगितले नसल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.Supreme Court
१५ जानेवारी २०२५ रोजी, सर्वोच्च न्यायालयाने सर्व उच्च न्यायालये , राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश दिले की प्रत्येक न्यायालयात पुरुष, महिला, दिव्यांग आणि ट्रान्सजेंडर्ससाठी स्वतंत्र शौचालये असावीत. घटनेच्या कलम २१ अंतर्गत योग्य स्वच्छतेची सुविधा हा मूलभूत अधिकार मानला जातो.
न्यायमूर्ती जेबी पारदीवाला आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांनी आज सर्व उच्च न्यायालयांना अहवाल सादर करण्यासाठी ८ आठवड्यांचा वेळ दिला आहे. जर यावेळी अहवाल सादर केला नाही तर उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलना स्वतः सर्वोच्च न्यायालयात हजर राहावे लागेल, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
देशातील ज्या पाच उच्च न्यायालयांनी हा अहवाल सादर केला आहे त्यात झारखंड, मध्य प्रदेश, कोलकाता, दिल्ली आणि पाटणा उच्च न्यायालयांचा समावेश आहे. वकील राजीव कलिता यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेने हे प्रकरण सुरू झाले, ज्यामध्ये त्यांनी न्यायालयांमधील शौचालयांच्या खराब स्थितीचा मुद्दा उपस्थित केला.
सर्वोच्च न्यायालयाने आधी म्हटले होते…
प्रत्येक उच्च न्यायालयात एक विशेष समिती स्थापन करावी, ज्याचे अध्यक्षपद एका वरिष्ठ न्यायाधीशाकडे असावे.
यामध्ये सरकारी अधिकारी, बार असोसिएशनचे सदस्य आणि आवश्यक कर्मचारी यांचा समावेश असावा.
दररोज किती लोक न्यायालयात येतात हे समितीने ठरवावे. शौचालयांची गरज त्यानुसार ठरवावी.
शौचालये बांधता यावीत आणि त्यांची स्वच्छता आणि देखभाल योग्यरित्या करता यावी यासाठी राज्य सरकारे पैसे देतील.
SC Slams Toilet Shortage in Courts; Demands Report from 20 HCs
महत्वाच्या बातम्या
- Nimisha Priya निमिषा प्रियावर फाशीची टांगती तलवार कायम, येमेनमधील न्यायप्रक्रियेवर गंभीर प्रश्न
- विधान भवनात फोटोसेशनच्या वेळी ठाकरे-शिंदे आमनेसामने; एकमेकांना पाहणेही टाळले
- Robert Vadra : मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा यांची 5 तास चौकशी; संजय भंडारीशी आर्थिक संबंधांवरून EDने घेतली झाडाझडती
- लडाखमध्ये तब्बल 15000 फूट उंचीवर आकाश एअर डिफेन्स सिस्टीमची चाचणी यशस्वी; चिनी धोक्याला थेट प्रत्युत्तर!!