• Download App
    Dattatreya Hosabale राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणात संघाची भूमिका कठोर; पण हिंदू विरोधी षडयंत्राकडेही बोट!!

    राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणात संघाची भूमिका कठोर; पण हिंदू विरोधी षडयंत्राकडेही बोट!!

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : अयोध्येतल्या श्रीराम मंदिरात देणगीची चोरी झाली. या विषयावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आज अधिकृतपणे कठोर भूमिका जाहीर केली. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी एक निवेदन जारी करून राम मंदिरातील देणगी चोरांना कठोर शासन झाले पाहिजे, पण त्याचवेळी राम मंदिरातल्या चोरीचे निमित्त करून हिंदू विरोधी आणि देशविरोधी तत्त्वांनी हिंदू धर्माच्या आणि हिंदू समाजाच्या बदनामीचे केलेले षडयंत्र उधळून लावले पाहिजे, असे स्पष्ट केले.

    अयोध्यातले श्रीराम जन्मभूमी मंदिर हे संपूर्ण हिंदू समाजाचे आस्था असलेले स्थान आहे. तिथे झालेली देणगीची चोरी अत्यंत दुर्दैवी आहे. त्या संदर्भात सरकारने कठोर कायदेशीर कारवाई करून दोषींना कठोरातील कठोर सजा द्यावी असेच संघाचे मत असल्याचे दत्तात्रय होसबळे यांनी स्पष्ट केले. हिंदू समाजाने धैर्य राखावे.

    राम मंदिरातील चोरीचे निमित्त‌ करून हिंदू विरोधी आणि देशविरोधी तत्वे हिंदू समाजाला आणि हिंदू धर्माला बदनाम करायचा प्रयत्न करत आहेत, तो त्यांचा डाव हिंदू समाजाने हाणून पाडावा, असे आवाहनही दत्तात्रय होसबळे यांनी केले. त्याचबरोबर त्यांनी राम मंदिरातील सर्व व्यवस्था सुरळीत करण्यात येतील, अशी ग्वाही सुद्धा दिली.

    – “त्या” तिघांची नावे नाही घेतली

    मात्र या निवेदनात दत्तात्रय होसबळे यांनी चंपत राय, अनिल मिश्रा आणि गोपाल राव यांची नावे घेतली नाहीत. राम मंदिरातील चोरी प्रकरणात आढळलेल्या सर्व दोषींना कठोर कायदेशीर शिक्षा करावी, अशी संघाची भूमिका त्यांनी जाहीर केली.

    Statement issued by Dattatreya Hosabale about Ram Mandir

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ममता आणि पवारांचे पक्ष काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या नुसत्या चर्चा; पण अजून कार्यवाही का होई ना??

    Gulf of Aden : भारतीय नौदलाने समुद्री चाच्यांचा हल्ला हाणून पाडला; एडनच्या आखातात आयएनएस त्रिकंडच्या मार्कोस कमांडोना पाहताच दरोडेखोर पळून गेले

    Supreme Court : सुप्रीम कोर्ट म्हणाले- निर्णयांमधील AI ची खोटी उदाहरणे धोकादायक; हे मिथाइल आयसोसायनेटसारखे, यामुळे न्यायव्यवस्थेचे नुकसान