• Download App
    ST Corporation, : कुर्नूल बस दुर्घटनेनंतर एसटी महामंडळ सतर्क; 'स्लीपर बस प्रवासी सुरक्षा' अभियान सुरू, प्रवाशांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना जारी | The Focus India

    ST Corporation, : कुर्नूल बस दुर्घटनेनंतर एसटी महामंडळ सतर्क; ‘स्लीपर बस प्रवासी सुरक्षा’ अभियान सुरू, प्रवाशांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना जारी

    ST Corporation,

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : ST Corporation आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी स्लीपर बसला लागलेल्या आगीत २० प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देश हादरला असून, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी आणि आपत्कालीन प्रसंगी योग्य प्रतिसाद देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने म्हणजे एसटी महामंडळाने “शयनयान वाहन प्रवासी सुरक्षा मार्गदर्शन” अभियान सुरू केले आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.ST Corporation

    या अंतर्गत स्लीपर बसमधील प्रवाशांनी स्वतःची व इतरांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी काही आवश्यक उपाय व नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.ST Corporation



     

    आपत्कालीन प्रसंगी बाहेर पडण्याचे प्रमुख मार्ग

    तज्ञांच्या मते, आग लागल्यास किंवा अपघात झाल्यास बसमधून सुरक्षित बाहेर पडण्याचे काही निश्चित मार्ग असतात, मात्र त्यांची माहिती नसल्यामुळे अनेकदा जीवितहानी वाढते.

    मुख्य दरवाजा नेहमी खुला आणि अडथळामुक्त ठेवावा.

    आपत्कालीन दरवाजा (Emergency Exit) — बसमध्ये असलेला हा मार्ग कधीही अडथळ्यांनी रोखू नये.
    छतावरील एस्केप हॅच (Escape Hatch) — बसच्या छतावर साधारणपणे दोन ते तीन हॅच असतात; आगीच्या प्रसंगी त्यांचा वापर करावा.
    सुरक्षा हातोडी (Emergency Hammer) — प्रत्येक वातानुकूलित बसच्या खिडकीजवळ असते; काच फोडून बाहेर पडण्यासाठी याचा उपयोग करावा.
    प्रवाशांनी घ्यावयाची काळजी आणि तयारी

    परिवहन विभागाने दिलेल्या सूचनांनुसार प्रवाशांनी खालील बाबींचे पालन करावे

    बसमध्ये बसल्यानंतर सर्व बाहेर पडण्याचे मार्ग ओळखून ठेवा.
    आपत्कालीन दरवाज्यासमोर सामान ठेवू नका.
    हातोडी व तिचा वापर ओळखून ठेवा.
    मानसिक तयारी ठेवा, संकटाच्या वेळी घाबरू नका, शांतपणे कृती करा.
    कपड्यांना आग लागल्यास पाणी किंवा चादर टाकून आग विझवावी.
    धूर भरल्यास जमिनीच्या जवळून सरकून बाहेर पडावे.
    कोणत्याही परिस्थितीत सामान वाचवण्याचा प्रयत्न करू नये.
    बस सुरू होण्यापूर्वी चालक व वाहक यांनी प्रवाशांना आपत्कालीन मार्गांची माहिती द्यावी.
    अतिरिक्त सुरक्षा सूचना

    परिवहन विभागाने काही पूरक खबरदारींचीही सूचना केली आहे.

    बसमध्ये चढल्यानंतर जर धूर, जळक्या वायरी, किंवा चार्जिंग पॉईंट गरम होणे दिसले, तर त्वरित चालकाला कळवा.
    ज्वलनशील पदार्थ, फटाके, पेट्रोलियम पदार्थ घेऊन प्रवास करू नका.
    विशेषतः रात्रीच्या प्रवासात सतर्कता बाळगा.
    आपत्कालीन मदतीसाठी ‘१००’, ‘१०८’ किंवा स्थानिक अग्निशमन दलाशी संपर्क साधा.
    “आगीचा त्रिकोण” समजून घ्या

    तज्ञांच्या मते, आग टिकून राहण्यासाठी ऑक्सिजन, उष्णता आणि ज्वलनशील पदार्थ असे तीन घटक आवश्यक असतात. यांपैकी एक घटक तोडल्यास आग नियंत्रणात येऊ शकते. त्यामुळे प्रवाशांनी शक्य असल्यास आग अलगद झाकून ऑक्सिजनचा पुरवठा थांबवण्याचा प्रयत्न करावा.

    सजग प्रवासी म्हणजे सुरक्षित प्रवास – सरनाईक

    परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “स्लीपर बस ही प्रवासासाठी आरामदायी असली, तरी सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. प्रवासी स्वतः जागरूक राहिले, तर अशा दुर्घटना टाळता येऊ शकतात. कुर्नूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर या मोहिमेचा उद्देश प्रवाशांमध्ये सुरक्षा सजगता वाढवणे हा आहे. कारण सजग प्रवासीच सुरक्षित प्रवासाची हमी देऊ शकतो.”

    MSRTC Launches Sleeper Bus Passenger Safety Campaign After Kurnool Fire Guidelines Issue

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Jyoti Malhotra : हिसारची यूट्यूबर ज्योती तुरुंगातून बाहेर येणार नाही; जामीन अर्ज फेटाळला, कोर्टाने म्हटले- तपासावर परिणाम होऊ शकतो

    Tamil Nadu : कोट्यवधींच्या इरिडियम व्यवहारप्रकरणी तामिळनाडूमध्ये 27 जणांना अटक; CBCIDने ग्राहक असल्याचे भासवून कारवाई केली

    Indigo : मुंबईहून कानपूरला जाणाऱ्या इंडिगो विमानात तांत्रिक बिघाड; 20 मिनिटे हवेत घिरट्या घालत राहिले, गोंधळ उडाला