• Download App
    झारखंडनंतर आता यूपी विधानसभेतही नमाजेसाठी स्वतंत्र खोली देण्याची मागणी, सपा आमदार इरफान सोलंकींचे सभापतींना साकडे|SP MLA Irfan Solanki Demands Room For Namaz in UP Assembly

    झारखंडनंतर आता यूपी विधानसभेतही नमाजेसाठी स्वतंत्र खोली देण्याची मागणी, सपा आमदार इरफान सोलंकींचे सभापतींना साकडे

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभेत नमाजसाठी वेगळ्या प्रार्थना कक्षाची मागणी करण्यात आली आहे. अशी मागणी समाजवादी पक्षाचे (सपा) आमदार इरफान सोलंकी यांनी केली आहे. त्यांनी सभापती हृद्य नारायण दीक्षित यांच्याकडे सभागृहात नमाजसाठी प्रार्थना कक्षाची मागणी केली आहे. ते म्हणाले की, विधानसभेत इबादतसाठी एक खोली दिल्यास कुणालाही त्रास व्हायचे कारण नाही.SP MLA Irfan Solanki Demands Room For Namaz in UP Assembly

    कुणालाही त्रास होणार नाही – आ. इरफान सोलंकी

    सपा आमदार म्हणाले, “इबादतही आवश्यक आहे आणि विधानसभा अधिवेशनदेखील आवश्यक आहे. विधानसभेत प्रार्थनेसाठी जागा असावी.” सोलंकी म्हणाले की, मुस्लिम आमदारांना अधिवेशन सोडून मशिदींमध्ये नमाजासाठी जावे लागते.



    विधानसभा अध्यक्षांची इच्छा असल्यास ते एक छोटी खोली इबादत करण्यासाठी देऊ शकतात. ते म्हणाले की यामुळे कोणालाही त्रास होणार नाही किंवा कोणतीही समस्या येणार नाही.

    दरम्यान, यापूर्वी झारखंडमध्ये नमाजसाठी स्पीकर रूम देण्यात आली आहे. मात्र, विरोधी पक्ष भाजपनेही सभापतींच्या निर्णयाला विरोध केला आहे. झारखंड विधानसभेच्या अध्यक्षांनी नमाजसाठी खोली देण्याचे आदेश जारी केले आहेत. “नवीन विधानसभा इमारतीत प्रार्थना करण्यासाठी खोली क्रमांक TW 348 देण्यात आला आहे,” असे आदेशात म्हटले आहे

    SP MLA Irfan Solanki Demands Room For Namaz in UP Assembly

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Longest serving PM : नरेंद्र मोदी, सेवारत जन स्वधर्म तत्पर!!

    Mamata Banerjee : टीएमसीत बंडानंतर ममता बॅनर्जींची मोठी चाल; कल्याण बॅनर्जी लोकसभेचे मुख्य व्हिप, पण पेच कायम

    PM Narendra Modi : मोदी सलग सर्वाधिक काळ निवडलेले पंतप्रधान; नेहरूंचा 4398 दिवसांचा विक्रम मोडला; आज एनडीएतील घटक पक्षांना संबोधित करणार