गंगाराम रुग्णालयातील डॉक्टरांचे विशेष पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : छातीत संसर्ग झाल्याच्या तक्रारीनंतर काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी त्यांना दाखल करण्यात आले आहे. गंगाराम रुग्णालयातील डॉक्टरांचे विशेष पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. Sonia Gandhis health deteriorated admitted to hospital in Delhi
गंगाराम हॉस्पिटलनेही सोनिया गांधींच्या प्रकृतीबाबत एक निवेदन जारी केले आहे. रूग्णालयाने सांगितले आहे की, सोनिया गांधी दीर्घकाळापासून या समस्येने त्रस्त आहेत आणि त्यांना नियमित तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे.
सोनिया गांधी यांना तब्येतीच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्याची ही पहिलीच वेळ नाही. या वर्षाच्या सुरुवातीला देखील ३ मार्च रोजी सोनिया गांधी यांना तापामुळे गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यादरम्यान चेस्ट मेडिसिनचे डॉक्टर अरुप बसू आणि त्यांच्या टीमने सोनिया गांधींवर उपचार केले होते. त्यादरम्यान त्यांच्या काही तपासण्याही करण्यात आल्या होत्या.
Sonia Gandhis health deteriorated admitted to hospital in Delhi
महत्वाच्या बातम्या
- जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीमारावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…
- इथेनॉल इफेक्ट : तेल आयातीतून 53894 कोटी रुपये वाचले; शेतकऱ्यांना 40600 कोटी रुपयांचे जादा उत्पन्न मिळाले!!
- आधी पोलिसांवर दगडफेक, 12 पोलीस जखमी, त्यानंतर जालन्यात लाठीमार; फडणवीसांचा स्पष्ट खुलासा
- Aditya-L1 : सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘ISRO’ आज लॉन्च करणार ‘आदित्य एल 1’; जाणून घ्या वेळ