• Download App
    इथेनॉल इफेक्ट : तेल आयातीतून 53894 कोटी रुपये वाचले; शेतकऱ्यांना 40600 कोटी रुपयांचे जादा उत्पन्न मिळाले!!|Ethanol effect : Rs 53894 crore saved from oil import; Farmers got an additional income of Rs 40600 crore!

    इथेनॉल इफेक्ट : तेल आयातीतून 53894 कोटी रुपये वाचले; शेतकऱ्यांना 40600 कोटी रुपयांचे जादा उत्पन्न मिळाले!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करून ते वापरले पाहिजे यासाठी केंद्र सरकारने प्रोत्साहन दिल्यानंतर त्याचा आर्थिक लाभ झाल्याचे समोर आले आहे. देशाच्या तेल आयातीतल्या परकीय चलनात तब्बल 53894 कोटी रुपयांची बचत झाली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना 40600 कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न देखील मिळाले आहे बाकी अनुषंगिक फायदे झाले ते वेगळेच.Ethanol effect : Rs 53894 crore saved from oil import; Farmers got an additional income of Rs 40600 crore!

    पेट्रोल आणि डिझेलला पर्यायी इंधन म्हणून इलेक्ट्रिक वाहने, सौर ऊर्जेवरची वाहने याचा सरकार विचार करते आहे, इतकेच नाही तर त्याच्या उत्पादनाने विक्री आणि वापराला प्रोत्साहन देते आहे. परंतु त्या आधीचा टप्पा म्हणून पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्याचे सरकारने ठरविले. तसा कायदा केला आणि त्याचा आर्थिक लाभ आता समोर आला आहे



    तो असा :

    •  इथेनॉलचे पेट्रोलमध्ये मिश्रण करून तेल आयातीवर परकीय चलनात ₹53894 कोटींची बचत
    •  शेतकऱ्यांना ₹40600 कोटींचे अतिरिक्त उत्पन्न
    • 20% हायड्रोकार्बन उत्सर्जन कमी. ऊस, तुटलेले तांदूळ आणि इतर कृषी उत्पादनांमधून इथेनॉल काढले जात असल्याने कापणीनंतर साल जाळण्याचे प्रमाण कमी. प्रदूषणावर नियंत्रण.
    • E-20 (20% इथेनॉल असलेले पेट्रोल) 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 84 पेट्रोल पंपांवर सध्या उपलब्ध

    Ethanol effect : Rs 53894 crore saved from oil import; Farmers got an additional income of Rs 40600 crore!

    Related posts

    काँग्रेसची तामिळनाडूत जोसेफ विजयच्या TVK पक्षाच्या सत्तेत शिरकत; पण INDI आघाडीच्या बैठकीत काँग्रेसने काढली त्या पक्षाची इज्जत!!

    CM Suvendu Adhikari : ‘4,800 बांगलादेशी घुसखोर ओळखले, 836 जणांना हद्दपारीची प्रतीक्षा’; पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचा दावा

    Ashok Gehlot : ‘सोनिया गांधींनी सांगितले असते तर मी काँग्रेस अध्यक्षपद नाकारले नसते’; अशोक गेहलोतांचा 2022 च्या घडामोडींमागे ‘कट’ असल्याचा आरोप